ऐकावं ते नवलचं....! 'काळखैरेवाडी'च्या या पठ्ठ्यानं मोबाईल कंपनीकडे केल्या तब्बल ७ हजार तक्रारी

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
बारामती : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील सुपे परगणा येथील काळखैरवाडी नजीक राजबाग येथील एका युवकाने मोबाईल नेटवर्कला वैतागून गेल्या पाच वर्षात मोबाईल कंपनीला तब्बल ७ हजार तक्रारी केल्या आहेत. स्वप्नील आत्माराम भोंडवे असे या ७ हजार तक्रारी करणाऱ्या युवकाचे नाव आहे.  
           स्वप्नील भोंडवे याने दिलेल्या माहितीनुसार, काळखैरेवाडी आणि राजबाग या ठिकाणी तब्बल आयडिया आणि व्होडाफोन चे हजार ते बाराशे ग्राहक असून या गावांमधून आज तागायत मोबाईल चे नेटवर्कच आले नाही. मोबाईलला नेटवर्क यावे म्हणून स्वप्नील भोंडवे हा युवक गेली पाच वर्षे झगडत आहे. स्वप्नील ने २०१६ पासून संबंधित मोबाईल कंपनीचे ग्राहक सेवा केंद्र, appellate केंद्र, ग्राहक सेवेच्या मेलआयडी वर तसेच कंपनीचे सीओई  रवींद्र ठक्कर यांना मेल करत गेल्या पाच वर्षात तब्बल ७ हजार तक्रारी केल्या आहेत.
To Top