सोमेश्वर रिपोर्टर टिम
बारामती दि २१
बारामती जवळच्या गोखळी येथील स्वरा भागवत या सात वर्षाच्या मुलीने महाराष्ट्रातील सर्वात उंच असलेल्या कळसुबाई शिखरावर चढाई केली. 1 तास 57 मिनिटे एवढ्या कमी कालावधीत कळसुबाईचे शिखर पार करणारी स्वरा सर्वात लहान मुलगी ठरलीय. तिच्या या यशाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
स्वरा योगेश भागवत सात वर्षाची मुलगी व्यायामाचे विविध प्रकार करते. आपण वाचत आहात सोमेश्वर रिपोर्टर
दहा तासात 143 किलोमीटर सलग सायकल चालल्याने मुलगी सोशल मीडियावर चर्चेत आली होती. त्यानंतर 18 फेब्रुवारी रोजी नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर जवळील कठीण असणारा हरीहर गड ट्रेक करून दुसर्याच्याच दिवशी स्वरा भागवत ने शिवजयंतीच्या निमित्ताने महाराष्ट्रातील सर्वात उंच असलेले कळसूबाई शिखर सर केले. एक तास 56 मिनिटे एवढ्या कमी कालावधीत हा अवघड असलेला ट्रेक पूर्ण केला. स्वराने सायं 6 वा.1 मिनिटांनी शिखर सर करण्यासाठी सुरूवात केली व 7 वाजुन 57 मिनिटांनी हे शिखर सर केले. स्वराने वयाच्या ७ व्या वर्षी केलेल्या विक्रमाबद्दल महाराष्ट्राचे अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सन्मान केला.
कळसुबाई शिखराची उंची ही 1 हजार 46 मीटर आहे. हे शिखर महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे. तिच्या या मोहिमेत तिचे वडील योगेश भागवत, अस्लम शेख सहभागी झाले होते.आपण वाचत आहात सोमेश्वर रिपोर्टर तिने यापूर्वी 10 तासात 143 किलोमीटर सायकलिंग सहाव्या वर्षी विक्रम केला होता तर स्वराच्या 50 प्रकारच्या दोरीवरील उड्या, 1 मिनिटात 100 पुश्यप काढणे आदी विक्रमाची 'इंडिया बुक ऑफ द रेकॉर्ड'ने नोंद घेतली आहे. स्वराच्या या यशाने तिच्या आणखी एका विक्रमा मध्ये भर पडली आहे.