सोमेश्वर रिपोर्टर टीम---- --
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
वडगाव निंबाळकर ता. बारामती येथिल विष्णु पंचायतन मंदीरातील पंचधातुची मुर्ती चोरीला गेल्याचा प्रकार मंगळवार पहाटे उघडकीस आला. सायंकाळी दिवाबत्ती केल्यानंतर मंदीर बंद केले होते. सकाळी पुजेसाठी राजेंद्र काकडे गेले असता गाभाऱ्याचे दार उघडे दिसले आतील मुर्ती पंचधातुची सुमारे शंभर वर्षापुर्वीची होती. पुरातन मंदीरात घडलेल्या या प्रकाराबाबत भावीकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या.
-------------------------------------