मोटारसायकल पार्किंग करताय? या गोष्टींची काळजी घ्या ,बारामती पोलिसांचे आवाहन

Pune Reporter
सोमेश्वर रिपोर्टर टिम - - - 
बारामती दि २२
बारामती शहर पोलीस ठाण्याला जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात एकूण पाच शाईन मोटरसायकल चोरी झालेल्या बाबतच्या माहिती प्राप्त झाली. 

यापुढे माननीय पोलीस अधीक्षक यांच्या आदेशान्वये मोटारसायकल चोरीचा प्रकाराची माहिती मिळाल्याबरोबर तात्काळ अधिकारी व तपासी पथक त्या ठिकाणी भेट देते. या पद्धतीप्रमाणे तपासी पथकाला त्याठिकाणी चोरी माहितीच्या ठिकाणी पाठवण्यात आले. या पाचही ठिकाणी शाईन कंपनीच्या व हिरो होंडा कंपनीच्या गाड्या चोरी गेल्याची माहिती होती. 

नंतर काही वेळानंतर त्या ठिकाणी पथकाच्या असे निदर्शनास आले की दुसऱ्या त्याच कंपनीच्या गाड्या त्या ठिकाणी उभी आहेत. व नजरचुकीने लोकांनी त्या गाड्या त्यांची स्वतःची समजून  नेले आहेत. या वरून हे लक्षात आले  शाईन व हिरोहोंडा गाड्यांचे मॉडेल जुने झाले की त्याचे लॉक निकामी होऊन ते कोणत्याही चावी  उघडते. या कंपनीच्या गाड्यांचे लॉक असे सहजासहजी उघडत असल्याने  लोकांच्या ते लक्षात येत नाही व ते स्वतःची गाडी सोडून दुसरी गाडी नेतात v मूळ मालक पोलीस स्टेशनला तक्रार देतो . 

तरी यापुढे सर्व मोटरसायकल धारकांना विनंती करण्यात येते की बारामती शहरांमध्ये आसपासच्या खेडेगावातून मोठ्या प्रमाणात लोक मोटरसायकल वर येतात वाहने बाजारपेठेत लावतात त्याठिकाणी एक सारख्या प्रकारच्या गाड्या  उभे असतात नंतर जाताना दुसरीच गाडीला चावी लावून घेऊन जातात यामुळे गैरसमज निर्माण होतो. तरी यापुढे जुन्या झालेल्या हिरो होंडा किंवा शाईन गाड्या चे लॉक व्यवस्थित आहे का दुसऱ्याच्या चवीने उघडत नाही ना याची खात्री प्रत्येकाने करावी. बरेच लोक तर मार्केटमध्ये गाडीला चावी तसेच ठेवतात किंवा काही अशा गाड्या असतात की त्या गाड्या कोणतीही चावी न लावता चालू होतात. अशा पद्धतीने जुन्या आठ ते नऊ वर्षापूर्वी च्या गाड्यांची काळजी मालकांनी विशेष करून घ्यावी.मार्केट मध्ये गाडी नियमित पार्किंग ठिकाणी वाहतुकीला अडथळा न करता डबल स्टँड ला गाडी व्यवस्थित लावून लॉक करून मार्केट ला जावे ही विनंती. सर्व दुकानदारांनी आपले दुकान समोर सीसीटीव्ही लावावा जेणे करून आपले ग्राहकाचे मोटरसायकल कोणी नेले ते लक्षात येईल.
To Top