बारामती ! मुरूम वि. का. सोसायटीच्या १३ जागांसाठी २६ उमेदवार रिंगणात : १३ फेब्रुवारीला चित्र स्पष्ट

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
मुरूम विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी १३ जागांसाठी २६ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. अर्ज माघार घेण्याच्या बुधवार(दि.२) शेवटच्या दिवशी १७ उमेदवारांनी अर्ज माघार घेतले असल्याची माहिती  सहाय्यक निंबधक सहकारी संस्था बारामतीचे अधिकारी मिलिंद टांकसाळे यांनी दिली. एकूण ४५ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते यामध्ये दोन अर्ज बाद झाले होते. श्री मल्लिकार्जुन स्वाभिमानी गावकरी विकास पॅनेल व श्री मल्लिकार्जुन विकास पॅनेल मध्ये सरळसरळ लढत होणार हे आता स्पष्ट झाले असून मतदार कोणाच्या पारड्यात मत टाकतात हे १३ फेब्रुवारी ला स्पष्ट होणार आहे.
        अंतिम यादी प्रसिध्द करून गुरुवार(दि. ३) रोजी चिन्ह वाटप होणार आहे. १३ फेब्रुवारीला मतदान होऊन त्याचदिवशी मतमोजणी होणार आहे. सोसायटी निवडणुकीसाठी एकूण ८१० पात्र सभासद असून ते मतदानाचा हक्क बजावतील. सर्वसाधारण जागेसाठी ८, महिला प्रतिनिधी २, अनुसूचित जाती जमातीतील १,  इतर मागास प्रवर्ग मधून १ आणि भटक्या जाती जमाती, विशेष मागास प्रवर्ग मधून १ असे १३ उमेदवार मतदारांना निवडून देता येणार आहेत. गेल्या आठवडाभरापासून दोन्हीही पॅनलच्या प्रमुखांनी प्रचार सुरु केला असून दोन्हीही पॅनलकडून विजयाचा दावा केला जात आहे. मात्र मतदार राजा निवडणुकीत कोणाला साथ देतो हे येत्या रविवारी स्पष्ट होणार आहे. श्री मल्लिकार्जुन स्वाभिमानी गावकरी विकास पॅनेलचे प्रचार प्रमुख म्हणून सोमेश्वर कारखान्याचे माजी संचालक नामदेवराव शिंगटे काम पाहणार आहेत. 
श्री मल्लिकार्जुन स्वाभिमानी गावकरी विकास पॅनलचे उमेदवार पुढीलप्रमाणे :
 प्रशिल प्रकाश जगताप, विकास फत्तेसिंग जगताप, हनुमंत नामदेव कदम, अशोक शंकरराव कदम, संदीप एकनाथ चव्हाण, सतिश कांतीलाल चव्हाण, केतन एकनाथ शिंगटे, अमोल दत्तात्रय शिंदे, वसंत महादेव फरांदे, धोंडीबा मारुती भंडलकर, नंदकुमार शिवलाल सोनवणे, रुपा सिध्देश्वर कुंजीर, मुमताज फक्रुद्दीन इनामदार.
श्री मल्लिकार्जुन विकास पॅनेलचे उमेदवार पुढीलप्रमाणे : चंद्रकांत कृष्णराव जगताप, छोटूसो पंढरीनाथ जगताप, सुनिल महादेव कदम, शेखर महादेव कदम, विष्णु आनंदराव चव्हाण, रवींद्र बाळासो चव्हाण, बबन तुकाराम वाडकर, वसंत महादेव राऊत, एकनाथ शिवराम भंडलकर, विजय गोविंद फरांदे, अजित भिवराव सोनवणे, सुलभा धनंजय जगताप, बेबी सिकंदर पठाण. 
To Top