पुरंदर ! रंगाची उधळण करत मारामारीने वीर यात्रेची सांगता

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
परिंचे (वार्ताहार):
श्री क्षेत्र वीर(ता.पुरंदर) येथे श्री नाथ मस्कोबा महाराजांच्या यात्रेचा मुख्य दिवस मारामारी ने (रंगाची शिंपण) करत दहा दिवस सुरू असलेल्या यात्रेची सांगता करण्यात आली.  यावेळी मंदिरात सवाई सर्जाचा जयघोष करून मानाच्या पालख्यांवर फुलांची उधळण करत रंग टाकण्यात आला. देवाच्या लग्ना नंतर भाकणूक,गज गोपाळांच्या पंगती, मानाच्या पालख्या व काठ्यांची मंदिर प्रदक्षिणा असा दहा दिवसांच्या उत्सवाची सांगता श्री नाथ मस्कोबा व देवी जोगेश्वरी यांच्या उस्तव मुर्तींवर रंगाचे शिंपण करून करण्यात आली या उत्सवाला' मारामारी' असे म्हणतात.
    पहाटे श्रीनाथ म्हस्कोबा व देवी जोगेश्वरी यांच्या मूर्तीची महापूजा करण्यात आली दुपारी बारा वाजता धुपारती होऊन कोडीतची मानाची पालखी दुपारी बारा वाजता प्रथम देऊळवाड्यात आली त्यापाठोपाठ कनेरी, वाई, सोनवडी, भोडवेवाडी, कसबा पेठ (पुणे) या पालख्या व सोहळ्यातील वीस गावच्या वस्त्र धारण केलेल्या मानाच्या काट्या ढोल ताशा सह अबदागिरी, निशान, छत्री, दागिदार व सर्व मानकरी मंदिरातली मानाच्या पालखीने मंदिराला तीन प्रदक्षिणा पूर्ण केल्यानंतर देऊळ वाड्यातील दगडी कासवावर तात्याबा बुरुंगले, लक्ष्मण शिंगाडे, दादा बुरुंगले यांनी भाकणूक (भविष्यवाणी) सांगण्यात आली .
भाकणूकीत नंतर दुपारी दीड वाजता रंगाची शिंपण मानकरी जमदाडे यांच्यामार्फत करण्यात आली.एक मंदिर प्रदक्षिणा पूर्ण करून सर्व पालख्या आपापल्या स्थळी गेल्या यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. देवस्थानच्या वतीने यात्रे निमित्त भाविकांसाठी दर्शन रांगा, पिण्याचे स्वच्छ पाणी, परिसर स्वच्छता, मंदिर आकर्षक विद्युत रोषणाई, स्वयंसेवक आदी सुविधा पुरवण्यात आल्याचे देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संतोष धुमाळ यांनी सांगितले. सासवड पोलिस स्टेशनच्या वतीने चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला असल्याचे पोलीस निरीक्षक आण्णासाहेब घोलप यांनी सांगितले. 

To Top