भोरचं विसगाव खोरं ...! आमदार संग्राम थोपटे यांच्या हस्ते कोट्यवधींची विकासकामे

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
भोर : प्रतिनिधी
भोर तालुक्याच्या दक्षिण पट्ट्यातील काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला असणाऱ्या विसगाव खोऱ्यात आमदार फंडातील कोट्यवधी रुपयांचा निधीतून झालेल्या विकास कामांचे उदघाटन भोर-वेल्हा-मुळशीचे आमदार संग्राम थोपटे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

     विसगाव खोऱ्यातील नेरे, आंबाडे, बालवडी, वरवडी,पाले, गोकवडी, निळकंठ,हातनोशी, धावडी, भाबवडी, वडगाव-डाळ,  पळसोशी, वेनवडी, पोंबर्डी या गावांमध्ये आमदार संग्राम थोपटे यांनी अनेक कोटी रुपयांची पूर्णतः विकास काम केलेली असल्याने अनेक वर्षांपासून विसगाव खोरे काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. विकास कामांमध्ये गावगावांमधील कोंक्रेटचे अंतर्गत रस्ते, सामाजिक सभागृह, डांबरी रस्ता, स्मशानभूमी ,दलित जोड रस्ता, गटर, व्यायाम शाळा, सभामंडप  इत्यादी  कामांचे उद्घाटन करण्यात आले यावेळी तालुका अध्यक्ष शैलेश सोनवणे, राजगडचे संचालक उत्तम थोपटे, सामाजिक कार्यकर्ते आण्णा आंबवले,  माजी जि.प.सदस्य गीतांजली आंबवले, हनुमंत चव्हाण , अनिल सावले,  सरपंच प्रमोद थोपटे, माजी सरपंच चंद्रकांत नांगरे,  उज्वला बढे, उपसरपंच राजेंद्र चिकणे,  अमित दरेकर, अतुल किंद्रे, अर्जुन किंद्रे , संपत दरेकर आदिसह ग्रामस्थ आणि तरूण  मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
To Top