कौतुस्कास्पद ! मेढा कुडाळ दरम्यान पेटलेला वणवा जावलीच्या तहसीलदारानी स्वतः विझवला

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
जावली : धनंजय गोरे
जावली तालुका म्हणजे डोंगर रांगाचा प्रदेश त्यामुळे बऱ्याचदा येथील डोंगरांच्या मधे उन्हाळ्याच्या दिवसांच्या मधे वनवे लागत असतात त्यामुळे वनसंपदा नष्ठ होत असून वन विभागाच्या मार्फत वनवे न लावण्याचे वारंवार आवाहन करुन देखील वनवे लागत असून असाच प्रकार मेढा ते कुडाळ दरम्यान असणाऱ्या मालदेव घाट मधे गुरुवारी झाला यामधे या परिसरात मोठ्या प्रमाणात वनवा लागला असतानाच जावलीचे तहसीलदार राजेंद्र पोळ आपल्या सहकाऱ्यांच्या सोबत कामा निमित्त कुडाळ येथे जात असताना त्याना वनवा लागल्याचे दिसले.
                   प्रशासकीय कामात सर्व सामान्य जनतेच्या साठी काम करणारे प्रामाणिक तहसीलदार राजेंद्र पोळ यांनी प्रसंगावधान दाखवित गाड़ी तुन उतरून लागलीच स्वतः पुढाकार घेत वनवा विझ विण्यासाठी प्रयत्न सुरु केले,त्यांच्या सोबत महसूल सहाय्यक भंडारी,तलाठी सावंत,कांबळे तसेच चालक बेलोशे यांनी त्यांच्या सोबत वनवा विझविण्यास सुरुवात केली.शासकीय काम थोड़े दिवस थांब अशी अवस्था शासन दरबारी असते मात्र जावली चे तहसीलदार राजेंद्र पोळ यांच्या कड़े सर्व सामान्य जनतेची कामे त्वरित होत असतात गेल्या वर्षी झालेल्या अति वृष्टि मधील बाधित शेतकरी व ग्रामस्थांच्या मदती करीता तहसीलदार स्वतः घटनेच्या ठिकाणी हजर राहून मदत कार्य करीत होते,
            त्यांनी केलेल्या या कार्याचे जावली तालुक्यातील सर्वच स्तरातून कौतुक होत असून यावेळी त्यांनी संपर्क करून वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी याना याबाबत सूचना दिली या कामात त्याना मित्र मेळा फॉउंडेशनचे प्रविण पवार,सामाजिक कार्यकर्त्या उषा उंबरकर यांचे सहकार्य लाभले जवळपास एक तास वनवा विझविण्यासाठी सर्व जण प्रयत्न करीत होते.
To Top