माळेगाव दि २५
माळेगाव नगर पंचायतीच्या प्रशासकीय अधिकारी रंजना दुर्गाडे यांची महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी/संवर्ग कर्मचारी संघटना महिला संघटक म्हणून निवड करण्यात आली आहे.
राज्यातील ही सर्वात मोठी संघटना असून त्यास मंत्रालयाची मान्यता आहे.या निवडीबद्दल माजी ग्रामपंचायत सदस्य संतोष भोसले, रिपाइंचे तालुका युवकाध्यक्ष विश्वास भोसले यांनी रंजना दुर्गाडे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. तसेच माळेगाव नगर पंचायत कर्मचारी संघटनेने देखील सत्कार करुन शुभेच्छा दिल्या. यावेळी दादा सोनवणे,नेहाल भोसले, रेश्मा शेख, रेश्मा मांढरे,राजु शेख, दिलिप जाधव, शंकर ठोंबरे,दादा ठोकळ,आबा चव्हाण, विकास जाधव, अनिल नाईक, संदिप शिंदे, शितल चव्हाण,माया कदम उपस्थित होते.
दरम्यान महिला संघटक या नात्याने राज्यातील संघटनेच्या कर्मचारी यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील असे रंजना दुर्गाडे यांनी सांगितले.