बारामती ! गहू, सोयाबीन आणि द्राक्षांचे अधिक उत्पादन हवंय.....! पिकांचे नवीन तंत्रज्ञान आत्मसात करायचं आहे... तर सोनगाव येथे 'या' तारखेला रहा उपस्थिती

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
 सोमवार दिनांक 28 फेब्रुवारी 2022 रोजी राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून त्याचबरोबर आझादीचा अमृत महोत्सव आणि MACS-आघारकर संशोधन संस्थेच्या 75 वा वर्धापन दिना निमित्त शेतकरी बांधवांसाठी संस्थेमध्ये संशोधन होणाऱ्या गहू, सोयाबीन आणि द्राक्षे पिकांचे तंत्रज्ञान व अधिक उत्पादन देणाऱ्या  त्याचबरोबर रोग प्रतिकारक वाणांच्या माहितीचा प्रसार होण्यासाठी शेतकरी मेळाव्याचे आयोजन संस्थेच्या "प्रायोगिक संशोधन प्रक्षेत्र, सोनगाव, बारामती" येथे सकाळी 10 वाजता केले आहे. सर्व शेतकरी बांधवांनी कार्यक्रमास जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. संस्थेचे अनुवांशिक आणि पादप प्रजनन विभागाचे प्रमुख डॉ. मनोज डी ओक "गहू आणि सोयाबीनची गुणवत्ता आणि पोषण मूल्य" या विषयावर मार्गदर्शक भाषण करणार आहेत तसेच सस्थेच इतर वैज्ञानिक ही शेतकरी बांधवांना मार्गदर्शन करणार आहेत.
To Top