वाई : प्रतिनिधी
तरुणांची ताकत हि देशाची शक्ती आहे त्यासाठी त्यांचे शरीर निकोप आणी सुदृढ ठेवणे हि आजची गरज आहे अनेक गोरगरीब आणी शेतकरी कुटुंबातील तरुणांना व्यायामाची आवड आहे पण व्यायामाचे साहित्य गाव पातळीवर ऊपलब्ध होत नसल्याने व पैसे देऊन इतरत्र जीम मध्ये जाऊन व्यायाम करावा हि प्रत्येक युवकांची इच्छा होते हालाक्याच्या परस्थिती मुळे ते साध्य करता येत नाही हे त्याचे मुख्य कारण आहे असे असले तरी येथील तरुणांची ताकत हि देशाची शक्ती आहे हि शक्ती वाया जाऊ नये म्हणून खासदार श्रीनिवास पाटील यांनी सातारा जिल्ह्यातील गावो गावचा तरुण वर्गांचा संच हा एकत्रीत असावा हि भावना उराशी बाळगून स्वताच्या खासदार फंडातुन निधी खर्च करून
गावोगावी तरुणांच्या हाती पाच पाच लाखापर्यंतचे व्यायामाचे साहित्य पुरविण्याचा
सपाटा सुरू केला आहे या व्यायामाच्या साहित्याचा योग्य वापर करुन आपले शरीर देखणे आणी पिळदार बनवावे कारण तरुण टिकला तर देश
टिकेल अशी परिस्थिती आज निर्माण झाली आहे त्या साठी सातारा जिल्ह्यात श्रीनिवास फॉडीशन काम करीत आहे .अशी माहिती वाई तालुक्यातील चवणेश्वराच्या डोंगर रांगांच्या
कुशीत वसलेल्या भिलारेवाडी गावात आयोजित कार्यक्रमात खासदार पुत्र सारंग पाटील बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी
नवनिर्वाचित सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष नितीन काका पाटील होते .
या आयोजीत कार्यक्रमात नितीन काका पाटील
यांची बॅंकेच्या अध्यक्षपदी निवड झाल्या बद्दल
भिलारेवाडी ग्रामस्थांच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला तर खासदार श्रीनिवास पाटील यांचे विश्वासु असणारे युवा ऊद्योजक अॅड. निलेश डेरे यांनी भिलारेवाडी ग्रामस्थांच्या मागणी नुसार गावात स्वखर्चाने बांधुन दिलेल्या श्रीनिवास व्यासपीठाचा या वेळी उदघाटन करुन त्याचा लोकार्पण सोहळा पार पडला निलेश डेरे हे वाई तालुक्यातील गावांच्या गरजा ओळखून त्या त्या गावांना गरजे नुसार खासदार फंडातुन विकासात्मक दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून निधी निधी पोहचविण्याचे
काम करीत असतात खासदार श्रीनिवास पाटील यांना वाई तालुक्यातील डोंगर दर्या खोर्यातील मतदारांनी भरभरून मते देऊन विक्रमी मताने विजयी केले होते याची जाणीव ठेवूनच खासदार श्रीनिवास पाटील हे आपल्या
फंडातुन गावोगावी निधी खर्चुन विकासात्मक
कामे करताना दिसत आहेत असे गौरव ऊदगारही निलेश डेरे यांनी कार्यक्रमात बोलताना काढले .
या वेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शशिकांत पवार महादेव भाऊ मस्कर यांनी मनोगत व्यक्त केले वाई पंचायत समितीचे माजी उपसभापती अनील जगताप वाई कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती रविंद्र जाधव दादासाहेब गायकवाड यांची प्रमुख ऊपस्थिती होती.कार्यक्रमासाठी महिला ग्रामस्थ तरुणाई मोठ्या संख्येने ऊपस्थितीत होते या वेळी गावातील तरुणांना पाच लाखापर्यंतचे व्यायामाचे साहित्य खासदार श्रीनिवास पाटील यांनी दिल्या बद्दल त्याचे राहुल भिलारे आणी ग्रामस्थांनी आभार मानले आहेत .