महाराष्ट्र राज्य प्राध्यापक महासंघ च्या अध्यक्षपदी प्रा.एस.पी.लवांडे तर सरचिटणीसपदी प्रा.पी.बी. रघुवंशी यांची बिनविरोध निवड

Pune Reporter


पुणे दि ६
महाराष्ट्र राज्य प्राध्यापक महासंध (एम्. फक्टो) सर्वसाधारण सभा रविवार दि. ६ फेब्रुवारी सावित्रीबाई  फुले पुणे विद्यापीठ पुणे येथे संपन्न -२०२२ रोजी महासंघाच्या अध्यक्षपदी पुणे येथील प्रा.एस.पी.लवांडे तर  सरचिटणीसपदी  अमरावती येथील प्रा.पी.बी.रघुवंशी यांची बिनविरोध निवड झाली.

  यापूर्वी  प्रा.लवीडे महासंघाचे सरचिटणीस व प्रा. रघुवंशी खजीनदार म्हणून कार्यरत होते. दोघेही विद्यापीठाच्या विविध अधिकार मंडळावर उदा० व्यवस्थापन परिषद्, सिनेट, अभ्यासमंडळ इ० अधिकार मंडळावर कार्यरत होते तसेच आपल्या घटक संघटनांचे नेतृत्व अनेक वर्षापासून करीत आहेत.

त्याचबरोबर महासंघाच्या सहसचिव प्रा. संजय सोनवणे (धुळे) व प्रा. एच.के अवताडे (सोलापुर) आणि खजिनदार प्रा.एन्. बी. पवार (नाशिक) यांचीही बिनविरोध निवड झाली.

महाराष्ट्र प्राध्यापक महासंघ महाराष्ट्रातील दहा अकृषी विद्यापीठामधील ४० हजार प्राध्यापकांचे प्रतिनिधित्व करत असून १९७५ पासून कार्यरत आहे.

कोव्हीड-१९ च्या प्रादुर्भावामुळे लांबलेला  सभा रविवारी पुणे विद्यापीठामध्ये संपन्न झाली. महासंघाच्या बैठकीमधे सरचिटनीसांचा अहवाल व वार्षिक हिशोबपत्रकास मंजुरी देण्यात आली तसेच प्रलंबित प्रश्नासाठी भविष्यामध्ये संघर्ष उभा करण्याची भूमिका महासंघाच्या वतीने जाहिर करण्यात आली.
To Top