सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : प्रतिनिधी
भोर तालुक्यात कोरोनाची तिसरी लाट मंदावत चालली असून १ हजार ३०० जणांना बुस्टर डोस देण्यात आला आहे.तसेच पुढील काळात दररोज १०० लोकांना बूस्टर डोस देण्यात येणार आहे.असे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सूर्यकांत कऱ्हाळे यांनी सांगितले.
तालुक्यात रविवार दि-६ कोरोना पॉजेटीव ३ रुग्ण मिळून आले असून ४५ रुग्ण उपचार घेत आहेत.तर तिसऱ्या लाटेत एकूण ७७४ नवीन रुग्ण मिळून आले होते.त्यातील ७२३ बरे होऊन घरी परतले आहेत.दरम्यान तिसऱ्या लाटेत ६ जण दगावले आहेत.सध्या जरी कोरोना रुग्ण संख्या घट होत चालली असली तरी नागरिकांनी नियमांचे पालन करून स्वतःची काळजी स्वतः घ्यावी व लसीकरण पूर्ण करून घेऊन प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांनी केले आहे.