भोर ! विसगाव खोऱ्यातील घोलप, उभे जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम---------
भोर : प्रतिनिधी
भोर तालुक्याच्या दक्षिणेकडील विसगाव खोऱ्यातील नेरे येथील अमर आनंदराव उभे तर खानापूर येथील खंडोबा शंकर घोलप यांना पुणे जिल्हा परिषदेच्या जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने उपमुख्यमंत्री अजितदादा पवार ,जिल्हा परिषद अध्यक्ष निर्मला पानसरे,उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांच्या हस्ते अल्पबचत भवन पुणे येथील कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले.
           अमर उभे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उत्रोली येथे तर खंडोबा घोलप आंबाडे शाळेत कार्यरत आहेत.घोलप,उभे या शिक्षकांना जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाल्याने विसगाव खोरे तसेच तालुक्यातून त्यांचे अभिनंदन होत आहे.कार्यक्रम प्रसंगी शिक्ष संघटना अध्यक्ष सुदाम ओंबळे,पंडित गोळे,तालुका आदर्श शिक्षक अरविंद बढे,प्रदीप बदक,बापू जेधे,गोपाळ उभे,ग्रामस्थ महेश उभे,दौलती चिकने,राजू सावले उपस्थित होते.

To Top