बारामती दि.१८
विद्युत वितरण कंपनी च्या बारामती तालुक्यात अनेक तक्रारी आहेत. वरिष्ठांना सांगितल्यानंतर याची योग्य दखल घेतली जात नाही. केवळ ही बाब मोबाईल मेसेज द्वारे राज्याचे ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत समजते. यानंतर खुद्द मंत्रीमहोदयांनी आज बारामती ग्रामीण पत्रकार मनोहर तावरे यांना फोन करून याविषयी अधिक माहिती जाणून घेतली. याची गंभीर दखल घेऊन कारवाई करण्याचे संकेतही त्यांनी दिले आहेत.
बारामती ग्रामीण भागात विद्युत वितरण कंपनीचे कामकाजाला अनेक ग्राहक कंटाळले आहे. कर्मचाऱ्यांची मनमानी , भ्रष्टाचार, चुकीच्या पद्धतीने होणारी कामे राजकिय व प्रतिष्ठितांना मिळणारा अभय असे अनेक तक्रारींचा विषय आहेत. काल ता.१७ फेब्रुवारी २०२२ रोजी याविषयी सविस्तर चर्चेसाठी बारामती उर्जा भवन येथे अधीक्षक अभियंता यांची पत्रकार तावरे यांनी भेट घेतली. परंतु संबंधित अधिकाऱ्यांनी समाधानकारक चर्चा केली नाही.
यानंतर हाच विषय उर्जा भवन येथील वरिष्ठ मुख्य अभियंता यांनाही सांगण्यात आलाय.अनेक गंभीर विषयांकडे दुर्लक्ष होत असल्याने लक्ष वेधण्यासाठी केवळ मोबाईल मेसेज द्वारे ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांना कळविण्यात आले. आज खुद्द राज्याचे ऊर्जामंत्री यांनी याविषयी अधिक तपशील जाणून घेण्यासाठी पत्रकार मनोहर तावरे यांना संपर्क केला आहे.
विद्युत वितरण कंपनीतील अनेक गोपनीय बाबी संदर्भात चर्चा करण्यात आली असून लवकरच याबाबत पुढील कारवाई करण्याचे संकेत ऊर्जामंत्री यांनी दिले आहेत.