भले शाब्बास ...! 'बारामती'च्या मुरूमचा सचिन भिलारे झळकला.....'पावनखिंड' चित्रपटात 'आगीण्या'च्या भूमिकेत

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----  
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील मुरूम गावामधील सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या कुटुंबाला जन्माला आलेला सचिन भिलारे बहुचर्चित पावनखिंड या मराठी  चित्रपटात आगिन्या च्या भूमिकेत दिसून येणार आहे . 
          सचिन भिलारे यांनी आजपर्यंत अनेक नाटके ,टीव्ही मालिका व चित्रपट यामध्ये छोट्या मोठ्या भूमिका साकारल्या आहेत .पंधरा वर्षांपूर्वी  ग्रामीण भागातील एक सर्वसामान्य युवकने गावातील रंगवर्षा सांस्कृतिक कला मंचाच्या 'लहानपण देगा देवा' या नाटकापासून त्याने सुरवात केला आणी पावनखिंड या चित्रपटात एक महत्त्वाची भूमिका तो साकारत आहे. त्यांनी आजपर्यंत  एलिझाबेथ एकादशी, रंगा पतंगा या चित्रपटांमध्ये छोट्या भूमिका केल्या आहेत अातो सोनी टीव्हीवरील ज्ञानेश्वर या संत ज्ञानेश्वर माऊली  या मालिकेमध्ये  प्रल्हाद ची भूमिका साकारत आहे.
.       पावनखिंड या ऐतिहासिक पाश्र्वभूमी मराठी चित्रपटामध्ये आगीन्या म्हणून बहिर्जी नाईक यांचा महत्त्वाचा सहाय्यक म्हणून भूमिका साकारली आहे  या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी केले असून हा चित्रपट प्रदर्शित होऊन प्रेक्षकांच्या भेटीला आज आला असून सचिन भिलारे यांनी प्रेक्षकांना हा चित्रपट  थिएटरमध्ये जाऊन पाहण्याची  आव्हान केले आहे .
आगामी काळामध्ये सचिन हा  शेर शिवराज आणि  या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे
To Top