सोमेश्वर रिपोर्टर टीम--------
भोर : प्रतिनिधी
भोर तालुक्यातील हिरडस मावळ खोऱ्यातील हिर्डोशी येथे आम्ही भोरकर प्रतिष्ठान व डॉ.राऊत हॉस्पिटल भोर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत लहान मुले व स्त्रीयांसाठी आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिरात १०१ लाभार्थींची आरोग्य तपासणी करण्यात आली.
या शिबिराचे उद्घाटन मंडल अधिकारी पांडुरंग लहारे,सरपंच सुनिता मालुसरे यांचे हस्ते करण्यात आले.तर राऊत हॉस्पिटलचे स्त्रीरोग तज्ञ डॉ.चंद्रशेखर राऊत, बालरोग तज्ञ डॉ.प्रियंका राऊत,व डॉ.नारायण राठोड यांनी या शिबिरात तपासणी करून मार्गदर्शन करत लाभार्थींच्या शंकांचे निरसन केले.
या शिबिरात १०१ लहान मुले व महिलांची तपासणी करण्यात आली आहे. या शिबिरात हिर्डोशी,कोंढरी ,कारुंगण परिसरातील गावातील लहान मुले तपासणीसाठी आली होती.यावेळी हिर्डोशीच्या सरपंच उपसरपंच हनुमंत धामुनसे, तलाठी विकास कराळे,प्रहार संघटनेचे अध्यक्ष बापु कुडले, तंटामुक्ती अध्यक्ष लक्ष्मण धामुनसे,माजी सरपंच ज्ञानोबा धामुनसे, बाळासाहेब धामुनसे, भोरकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष समिर घोडेकर, उपाध्यक्ष संतोष शिवतरे, सचिव विनय पलंगे,खजिनदार मंगेश आवाळे,सदस्य विक्रम मालुसरे,प्रदीप दिघे, नाना कांबळे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
COMMENTS