बारामती ! 'मुरूम'ची 'ही' महिला पहाटेच धारपाणी करून जाते आणि पंचायत समितीच्या टोलेजंग इमारतीतून तालुक्याचा गाडा हाकते

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
बारामती : प्रतिनिधी
नवीन पंचायत समिती कार्यालय लोकाभिमुख कारभाराचे केंद्रबिंदू ठरेल अशी माहिती सभापती निता फरांदे यांनी दिली.नविन कार्यालयातुन कामकाजास सुरवात करण्यात आली आहे.
    बारामती पंचायत समिती नुतन कार्यालयाचे शिवजयंती दिनी खा.शरद पवार यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत झाले.राज्यातील प्रथमच एवढी मोठी पंचायत समिती कार्यालय असून बारामतीचे वैभव वाढवणारी हि इमारत आहे.
    या नुतन कार्यालयातुन सभापती निता फरांदे यांनी कामकाज सुरू केले आहे.यानिमीत्त माजी सभापती व विद्यमान सदस्य संजय भोसले व राहुल झारगड यांनी पुष्पगुच्छ देऊन सभापती निता फरांदे यांना शुभेच्छा दिल्या.यावेळी गटशिक्षणाधिकारी संजय जाधव, पप्पू सावंत, संतोष गावडे, अमोल भापकर, लखन शिर्के, अजित आत्तार उपस्थित होते.
     खा.शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सुचनेनुसार प्रत्येक ग्रामस्थांची अडचण सोडवण्यासाठी या कार्यालयाचा उपयोग केला जाईल असे सभापती निता फरांदे यांनी सांगितले.
     फोटो ओळी- पंचायत समितीच्या सभापती निता फरांदे यांचे स्वागत करताना माजी सभापती व विद्यमान सदस्य संजय भोसले, राहुल झारगड उपस्थित होते. 
To Top