सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
परिंचे : प्रतिनिधी
श्री क्षेत्र वीर (ता. पुरंदर) येथे आज पंचमी निमित्त देवाची भाकणूक करण्यास सुरुवात झाली. भविष्यवाणी ऐकण्यासाठी देऊळवाड्यात कोवीड १९ पार्श्वभूमीवर श्रीनाथ म्हस्कोबा देवाची यात्रा माननीय जिल्हाधिकारी यांच्या आदेशाप्रमाणे रद्द करण्यात आली आहे त्यामुळे ठराविक मानकरी सालकरी यांच्या उपस्थितीत देवळातील धार्मिक विधी 'सवाई सर्जाचा ' जयघोष करत भाकणूक साजरी करण्यात आली.
पंचमीनिमित्त पहाटे श्रीनाथ म्हस्कोबांची महापूजा करण्यात आली मंदिराचा मुख्य गाभारा बंद करण्यात आला. सकाळी सहा वाजता मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले. ठराविक प्रवेश पात्र मानकरी टाळकरी यांच्या उपस्थितीत शासनाचे सर्व नियम पालन करून मंदिरातही विधी करण्यात येत आले यावेळी कोडीत, कन्हेरी, थोपटेवाडी ,सोनवडी, राजेवाडी, कसबा पेठ (पुणे) सर्व फुलांनी सजवलेल्या पालख्या मध्ये उत्सव मूर्ती ठेवण्यात आल्या. देवाची धुप आरती झाल्यावर छबिन्याला सुरुवात झाली. वस्त्र परिधान केलेल्या मानाच्या काठ्या व पालख्यांची एक मंदिर प्रदक्षिणा पूर्ण झाल्यावर देवाचे मानकरी तात्याबा बुरुंगले यांनी भविष्यवाणी सांगितली.
यावर्षी मृगाचे पाणी चार खंडात पडेल, आश्लेषा मघा नक्षत्र दोन खंडात पडेल, जनतेचे समाधान होईल, बाजरीचे पिक चांगले येईल. गाई-गुरे, शेळीमेंढी यांच्यामागे रोगराई नसून मनुष्यामागे साधारण रोगराई राहील. हत्तीचे पाणी तीन खंडात पडेल, आश्लेषा मघा नक्षत्र दोन खंडात पडेल. अशा प्रकारे परंपरेने भाकणूक संपन्न झाली .भाकणूक झाल्यावर पालखीच्या तीन मंदिर प्रदक्षिणा पूर्ण झाल्यावर छबिन्याची सांगता झाली.
भाकणूकी साठी मंदिरामध्ये प्रवेश पात्र मानकरी, सालकरी, दागिनदार मंडळी उपस्थित होते. शासनाचे सर्व नियम पालन करून मंदिरात विधी करण्यात येत असल्याचे देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संतोष धुमाळ यांनी सांगितले. सासवड पोलिस स्टेशनच्या वतीने चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
COMMENTS