भोर ! पाण्याच्या शोधात शहरात आलेल्या भेकराचा कुत्र्यांच्या हल्ल्यात मृत्यू

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
भोर : प्रतिनिधी
अन्न-पाण्याच्या शोधात भोर शहरातील विध्यानगर येथील शिक्षक सोसायटीच्या परिसरात आलेल्या भेकराचा कुत्र्यांच्या टोळक्याने पाठलाग करून हल्ला केल्याने भेकर मोठ्या प्रमाणावर जखमी होऊन उपचारा दरम्यान मृत्यूमुखी पडले.
            भोर शहराशेजारी मोठं-मोठ्या डोंगर रांगा आहेत.या डोंगर रांगांच्या जंगलातील वन्यप्राणी शहराशेजारी अन्न-पाण्याच्या शोधात येत असतात.भोर शहरात २० ते २५ च्या गटाने कुत्र्यांची टोळकी फिरत असतात.ही भटक्या कुत्र्यांची टोळकी लहान मुले,ऑकिंगला जाणारे महिला-पुरुष तसेच वन्य प्राण्यांवर वारंवार हल्ले चढवीत असतात व झकमी करतात.शनिवार दि-१२ सायंकाळच्या वेळी भेकर या वन्यप्राण्यावर या कुत्र्यांच्या टोळक्याने हल्ला करून जखमी केले.या झकमी भेकरास कुत्र्यांच्या हल्ल्यातून शिक्षक सोसायटीतील तरुण दिपक गोळे, उत्तम खुटवड, धर्मा भालेघरे,जाधव यांनी वाचविले.झकमी भेकरावर डॉ.तळेकर यांनी उपचार केले.तरुणांनी काहीवेळात वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना बोलावून त्यांच्याकडे भेकरास सूपूर्द केले.मात्र भेकर मोठ्या प्रमाणावर जखमी आल्याने मृत्युमुखी पडले.
-------------
नगरपालिकेने भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा----
भोर शहरात शेकडोच्या पुढे भटकी कुत्री आहेत.ही कुत्री शहरात तसेच शहराबाहेर टोळक्याने फिरत असतात व नागरिक ,पाळीव प्राणी तसेच वन्यप्राण्यांवर हल्ला करून जखमी करीत असतात.भोर नगरपरिषदेने या भटक्या कुत्र्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.
To Top