पुरंदर ! स्वामी समर्थांच्या अक्कलकोट नगरीत जेजुरीकर भाविकांनी केली भंडाराची उधळण

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
जेजुरी : प्रतिनिधी 
जेजुरी येथील स्वामीमय सेवा ट्रस्टच्या वतीने सलग 20 व्या वर्षी ( जयाद्री ते  प्रज्ञापुर  ) जेजुरी ते अक्कलकोट असा स्वामीमय पादुका अक्कलकोट सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते . अक्कलकोट येथे सोहळा पोहचल्या नंतर खंडोबा देवाचे लेणं असणारा भंडारा उधळून येळकोट येळकोट जयमल्हार व स्वामी समर्थांचा जयघोष करण्यात आला .

        जेजुरी कडेपठार पायथ्यापासून जेजुरी ते अक्कलकोट सोहळ्याला प्रारंभ करण्यात आला . टेभूर्णी येथील  स्वामी भक्त सुनील जाधव सोलापूरचे बाळासाहेब गायकवाड, रवींद्र सुतार मोरगावचे अनिल शितोळे, मुंबईचे गोकुळ भोर ,सासवडचे चंदू गिरमे ,जेजुरीचे संतोष खोमणे यांनी या सोहळ्यात धार्मिक विधी व अन्नसेवेचे आयोजन केले होते .  हा सोहळा प्रज्ञापुरी मध्ये पोहचताच पाचशे जेजुरीकर भाविकांनी  खंडोबा देवाला प्रिय असलेल्या भंडाऱ्याची उधळण केली .
          वेदमूर्ती अन्नू महाराज, दत्ता महाराज जगताप आणि स्वामीमी सेवा ट्रस्टचे संस्थापक भगवान डीखळे  विश्व हिंदू परिषदेचे राजेंद्र चौधरी, पोपट खोमणे  आदी मान्यवरांच्या हस्ते भंडाराचा अभिषेक ,लघुरुद्र  पठण करण्यात आले . या वेळी जेजुरी खंडोबा देवाचे सेवेकरी कृष्णा कुदळे.जालिंदर खोमणे,  गौरव भाऊघोडे यांना श्री स्वामी सेवा सेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 
          श्री स्वामीमय आनंदसोहळयाचे आयोजन स्वामीमी सेवा ट्रस्ट अध्यक्ष भगवान  डीखळे. माउली  खोमणे , गणेश मोरे, डॉ गोरव नानोटी,  संतोष मोरे ,संतोष खोमणे ,नितीन कदम , कबीर मोरे, महेश कदम, तुषार हेंद्रे .संदीपता  गायकवाड, नयन गुरव आदींनी केले . 
To Top