ऊसावर 'ड्रोन'ने औषध फवारणीचं नवीन तंत्रज्ञान पाहिलंय का ? तर या उद्या सकाळी ठीक १० वाजता सोमेश्वरनगर येथे

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम---------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
 सद्य स्थितीत ऊस पिकावर तांबेरा, लाल ठिपके या रोगाचा व कांडी कीड, शेंडेकिड या किडिंचा प्रादुर्भाव दिसत आहे, त्यामुळे ऊस पिकाचे उत्पादनावर व साखर उताऱ्यावर अनिष्ठ परिणाम होत असून त्याचे नियंत्रण करण्यासाठी वाढ झालेल्या ऊसावरती औषध फवारणी करणे शक्य होत नसलेमुळे वरील किड व रोगांच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे
        कारखान्याचे संचालक ऋषिकेश गायकवाड यांच्या संकल्पनेतून कारखान्याने करंजेपुल येथील सभासदांचे शेतावर ड्रोनच्या सहाय्याने फवारणी चे प्रात्यक्षिक घेण्याचे नियोजन केले आहे. आय.पी.एल. ॲग्रोटेक सोमेश्वरनगर (वाघळवाडी) यांचे सौजन्याने (चातक इनोवेशन कंपनी) ऊस पिकावर फवारणीचे प्रात्यक्षिक खालील ठिकाणी ठेवण्यात आले आहे तरी जास्तीत जास्त सभासदांनी सदर प्रात्यक्षिक पाहणेसाठी शासन निर्गमित कोविड-१९ चे नियम पाळून माहिती घेण्यास उपस्थित राहावे. 

ठिकाण :विठ्ठल काशिनाथ गायकवाड यांचा प्लॉट बाजारतळा शेजारी करंजेपुल
गुरुवारी  दिनांक 3/2/2022 सकाळी 10 वाजता 

 संपर्क
विराज निंबाळकर ऊस विकास अधिकारी
           8600085005
 इन्द्रजीत जगताप 
           9529990738
 रोहन जगताप
             8390402993
To Top