सोमेश्वर रिपोर्टर टीम---------
काटेवाडी : प्रतिनिधी
काटेवाडी( ता बारामती) येथील ग्रामपंचायती च्या उपसंरपच पदी श्रीधर आनंदराव घुले यांची बिनविरोध निवड करण्यात आली. उपसंरपचपदाचा कार्यकाल सपंल्याने समीर मुलाणी यांनी राजीनामा दिला होता. त्या रिक्त झालेल्या जागेसाठी निवडणूक घेण्यात आली. सरपंच विदयाधर काटे यांच्या अध्यक्षतेखाली यासाठी विशेष बैठक घेण्यात आली. निर्धारित वेळेत घुले यांचा एकमेव अर्ज आल्याने ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब भोईटे यांनी त्यांची बिनविरोध निवडीची घोषणा केली. उपसंरपच पदी घुले यांची निवड जाहीर होताच त्याच्या समर्थकांनी गुलालाची उधळण करून वाद्याचे गजरात आनंदोत्सव साजरा केला नवनिर्वाचित उपसरपंच श्रीधर घुले यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, छत्रपती चे अध्यक्ष प्रशांत काटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला . बारामती टॅक्सटाईल पार्क च्या अध्यक्ष सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली माझी वसुंधरा अभियानात व गावाच्या विकासासाठी प्रयत्नशील राहून काम करणार असल्याचे नवनिर्वाचित उपसंरपच श्रीधर घुले यांनी सांगितले.यावेळी सरंपच विद्याधर काटे ,सोसायटीचे माजी अध्यक्ष अनिल काटे,संभाजी बिग्रेड चे कोषाध्यक्ष अमोल काटे .के.टी.जाधव, अमर जगताप ,रणजीत गायकवाड,दतात्रय देवकाते,शितल काटे,धीरज घुले,राहुल काटे, राजु भिसे,धनंजय काळे,पोलीस पाटील सचिन मोरे,प्रियंका देवकाते, हेमलता जगताप, स्वाती गरदडे, रंजना लोखंडे. पद्मिनी देवकर अदि उपस्थित होते.
COMMENTS