सोमेश्वर रिपोर्टर टीम------
परींचे : राहुल वाघोले
श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान ट्रस्ट वीर यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे पीएमपीएमएल मार्फत अखेर दि. ०१/०२/२०२२ रोजीपासून बससेवा सुरु करण्यात आली आहे. मागील खूप दिवसापासून एसटी सेवा खंडित झालेमुळे वीर येथे दर्शनासाठी येणारा मोठा भाविक वर्ग, परिसरातील गावातून प्रवास करणारे प्रवासी, मोठा विद्यार्थीवर्ग, ज्येष्ठ नागरिक यांना थोडाफार दिलासा देण्यासाठी देवस्थान ट्रस्टमार्फत केलेल्या प्रयत्नांना यश आल्याचे देवस्थान ट्रस्टचे चेअरमन श्री. संतोष धुमाळ यांनी सांगितले.
सदर बस सेवा चालू करण्यासाठी सर्व स्तरावरून प्रयत्न चालू होते.
वीर, परिंचे, पांगारे, पिंपळे, राउतवाडी, नवलेवाडी या गावांच्या परिसरातील सर्व प्रवाशांना या बससेवेचा फायदा होणार आहे. कोरोनानंतर चालू झालेल्या शाळा विद्यार्थ्यांची होणारी धावपळ याला पूर्णविराम लागणार आहे.
यावेळी पीएमपीएमएल चे व्यवस्थापकीय प्रशासन पदाधिकारी, वाहतूक व्यवस्थापक झेंडे साहेब, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, चेअरमन व विश्वस्थ श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान ट्रस्ट, वीर यांच्या उपस्थितीत सदर लोकार्पण सोहळा श्रीनाथ म्हस्कोबा मंदिर वीरच्या प्रांगणात ढोलताश्याच्या गजरात पार पडला. यावेळी देवस्थान ट्रस्टमार्फत बसला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. तसेच चालक, वाहक यांचा फेटा घालून सत्कार करण्यात आला. सर्व पीएमपीएमएल प्रशासन यांचाही देवस्थान ट्रस्टच्या वतीने शाल, श्रीफळ, देवाची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अमोल धुमाळ (देवस्थान खजिनदार) व प्रास्ताविक अभिजित धुमाळ (देवस्थान सचिव) यांनी केले.
यावेळी देवस्थान ट्रस्टचे विश्वस्थ हनुमंत धुमाळ, रवींद्र धुमाळ, नामदेव जाधव, रामचंद्र कुरपड, संजय कापरे आदी जन उपस्थित होते तसेच वीर गावाचे सरपंच माऊली वचकल, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्तेही उपस्थित होते.
COMMENTS