सोमेश्वर रिपोर्टर टीम------
वाई : प्रतिनिधी
किकली ता.वाई गावचे सुपुत्र ऊकृष्ट संसद पटु किसनवीर सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान हॉईस चेअरमन असलेले गजानन बाबर यांचे पुणे येथे अल्पशा आजाराने ऊपचारा दरम्यान निधन झाल्याने किकली गावासह किसनवीर परिवारावर शोककळा पसरली आहे .संपूर्ण महाराष्ट्रात ते सदैव चळवळीचे नेते गजानन भाऊ म्हणून ओळखले जात होते
पुणे येथील मावळ विधानसभा मतदार संघातून
ते दोन वेळा विधानसभेवर शिवसेनेच्या तिकिटावर निवडुन गेले होते याच मतदार संघातून ते लोकसभेत निवडुन गेले होते रोखठोक आणी परखडपणे बोलण्याची त्यांची सवय होती खासदारकवीच्या काळात सामाजिक शैक्षणिक सहकार आणी गोरगरीबांना न्याय मिळवून देण्यासाठी लोकसभेत विविध प्रकारच्या प्रश्र्नांची मांडणी करताना सभागृह दनानुन सोडत असे रांगडा आवाज असल्याने त्यांना कुठल्याही सभांमध्ये हातात माईक घेण्याची आवशक्ता भासत नव्हती .
COMMENTS