सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
वाई : प्रतिनिधी
वाई तालुक्यात गावा गावांनसह वाडीवस्तीनवर दि.19 रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी होणार असल्याने या कालावधीत काही तरुणवर्ग कायद्याला न जुमानता त्यांच्या कडून कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची व त्यातून दखलपात्र स्वरुपाचे गुन्हे घडण्याची दाट शक्यता निर्माण झाल्याची माहिती वाई पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांच्यासह भुईंज पोलिस ठाण्याचे सपोनि आशिष कांबळे यांना गोपनीय
मार्गाने प्राप्त होताच केंजळ ता.वाई गावासह हुल्लडबाजी करणार्या निवडक तरुणांची यादी वरील पोलिस ठाण्यांच्या अधिकार्यांनी तयार करुन ती वाई भुईंज मेढा विभागाच्या डिवायएसपी असलेल्या शितल खराडे जानवे
यांना कळविताच त्यांनी या यादीचे गांभीर्य ओळखून गावोगावी शिवजयंती शांततेत पार पाडण्यासाठी किमान दि.१८ ते २० या दोन दिवसा साठी हद्दीतून तडीपार करणे आवश्यक असल्याचे पत्र वाईचे प्रांताधिकारी राजेंद्र जाधव यांच्या कडे वाई पोलिस ठाण्याच्या हद्दीतील १८ भुईंज पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ३० तर केंजळ ता.वाई गावातील ६ अशा ऐकुन ५४ ऊपद्रव करणार्यांचे प्रस्ताव तयार करुन पाठवले होते प्रांताधीकारी यांनी डिवायएसपी कार्यालयातून आलेल्या प्रस्तावातील तरुणांच्या वर्तुनुकीची माहिती गोपनीय पध्दतीने संकलित करुन खात्री झाल्यावर ऐकुन ५४ जणांना शिव जयंती कालावधीतील दोन दिवसा साठी तडीपार करावेत असे लेखी आदेशाने वाईचे तहसीलदार रणजित भोसले यांना कळविताच तहसीलदार यांनी तात्काळ शिवकार्य व शिव प्रतिष्ठान संघटनेसह प्रतापगड उत्सव समितीच्या सक्रिय कार्यकर्त्यांना केंजळ गावासह दि.१८ फेब्रुवारी ते २० फेब्रुवारी पर्यंत तडीपार करण्याचे लेखी आदेश काढल्याने वाई तालुक्यात खळबळ ऊडाली आहे . तडीपार केलेल्या कालावधीतील दोन दिवसात आदेशाचे उल्लंघन करुन जे कार्यकर्ते सापडतील अशांनवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा गंभीर इशाराही वाईचे तहसीलदार रणजित भोसले यांनी दिला आहे ...