काठावरती मिळालेल्या विजयाचा डंका पिटणारयांचा खरं पाहता नैतिकदृष्ट्या पराभव : श्री मल्लिकार्जुन विकास पॅनल

Pune Reporter

सोमेश्वरनगर दि १९
          मुरूम विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या सन २०२२ ते २०२७च्या झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये कोणी कितीही विजयाचा डंका पिटत असले तरी सर्वसामान्य गावकरी शेतकरी सभासद जाणून आहे की हा विजय कशाप्रकारे मिळवला गेलेला आहे आणि याची चर्चा सबंध पंचक्रोशीत आणि बारामती तालुक्यामध्ये झालेली आहे. 
           वास्तविक पाहता गावांमध्ये गेल्या १०-१५ वर्षापासून ज्यांच्याकडे सर्व सूत्रे होती त्यांना या निवडणुकीमध्ये अक्षरशः विजया करता प्रचंड संघर्ष करावा लागला. साम-दाम-दंड-भेद विविध प्रकारचे दबावतंत्र प्रलोभने आमिषे यांना अक्षरशा या निवडणुकीमध्ये पेव फुटलं होतं आणि या सगळ्या कारणांमुळे अगदी काठावर चा विजय ही मंडळी प्राप्त करू शकली.
            
          वास्तविक पाहता गेल्या अनेक वर्षापासून बिनविरोध च्या नावाखाली गावातील सर्वसामान्य गावकऱ्यांना वेठीस धरणार यांना यावेळेस संविधानिक मार्गाने गावातील शिव शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांच्या प्रेरणेने प्रेरित असणाऱ्या तरुणांनी गावातील अनेक ज्येष्ठ ग्रामस्थांच्या सोबतीने आणि श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे कार्यक्षम चेअरमन  पुरुषोत्तम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक अतिशय चांगल्या विचारांनी आणि नेटाने लढवली आणि या पहिल्याच निवडणुकीत गावकऱ्यांनी भरघोस असा प्रतिसाद देऊन एकूण मतदानाच्या जवळपास 45 टक्क्याहून अधिक मते श्री मल्लिकार्जुन विकास पॅनलच्या उमेदवारांच्या पारड्यात टाकली. एवढी नेत्रदीपक कामगिरी प्रचंड धनशक्तीच्या विरोधात खेचून आणून देखील विजयाचा उन्माद बाळगणारी मंडळी मात्र काठावरती मिळालेल्या विजयाचा डंका सगळी कडे पिटत आहेत नैतिक दृष्ट्या पराभूत झाल्यामुळेच त्यांना असं करण्याशिवाय काहीच पर्याय नाही. वास्तविक पाहता या मंडळी या मंडळींना देखील आपण विजयी कसे झालो आहोत याची पूर्ण कल्पना आणि जाणीव आहे. 
            गावातील सर्व शेतकरी सभासदांच्या गावकऱ्यांच्या आणि बहुजन समाजाच्या न्याय हक्कासाठी सदै व कार्यरत राहण्याचा मनोदय श्री मल्लिकार्जुन विकास पॅनल च्या माध्यमातून या संपूर्ण गावाचं भलं हा एकच विचार घेऊन काम करणाऱ्या सर्व तरुणांनी ज्येष्ठांनी बोलून दाखवला आहे. बॅनरबाजी करून विजयाचा उन्माद माजवणारे एकीकडे आणि लोकशाही मार्गाने सर्व मतदार बंधू भगिनींचे आणि गावकऱ्यांचे प्रशासनाचे आभार मानणारे श्री मल्लिकार्जुन विकास पॅनलचे धोरण एकीकडे हाही फरक संबंध पंचक्रोशी मध्ये चर्चेचा विषय ठरलेला आहे. 

निवडणुकीपुरते गावकरी पॅनल व निवडून आल्यानंतर केवळ एका व्यक्तीच्या गटाचा विजय हेही या निवडणुकीच्या माध्यमातून गावकऱ्यांच्या लक्षात आलं आहे.आणि याच गाव वेठीस धरणाऱ्या प्रवृत्तींच्या विरोधात येणाऱ्या काळामध्ये लोकशाही मार्गाने संघर्ष करून बहुजनांच्या शेतकऱ्यांच्या सर्वसामान्यांच्या व गावकर्‍यांच्या हितासाठी सदैव झगडत राहण्याचा मनोदय आभार सभेच्या निमित्ताने श्री मल्लिकार्जुन विकास पॅनलच्या सर्व घटकांनी व्यक्त केला आहे.
To Top