भोर ! नसरापूर येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
पुणे - सातारा महामार्गावर चेलाडी फाटा (ता. भोर) येथे अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. त्याच्या डोक्यास व उजव्या पायास गंभीर दुखापत झाली होती. सचिन भगवान बांदल (वय- ३९, राहणार संगमनेर, ता. भोर) असे या अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना रविवारी (दि.१३) सायंकाळी ८ वाजण्याच्या दरम्यान घडली. सदर घटनेमुळे संगमनेर गावातील नागरिकांमधुन हळहळ व्यक्त होत आहे.
        सचिन हा रविवारी (ता. १३) सायंकाळी पॉवर कॉम कंपनीमधून काम 'संपल्यावर त्याच्या हीरो होंडा मोटारसायकलवरून (क्र. एमएच १२ आरडी ०४११) घराच्या दिशेने जात होता. त्यावेळी चेलाडी फाटा येथे अज्ञात वाहनाची जोरदार ठोकर बसल्याने तो गंभीर जखमी झाला. त्यास उपचारासाठी नसरापूर येथील खासगी रुग्णालयात आणले असता  उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याबाबत राजगड पोलिस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याची फिर्याद सचिनचे चुलत बंधू उमेश बांदल यांनी दिली. पुढील तपास राजगड पोलिस ठाण्याचे सहाय्यक फौजदार संजय ढावरे करीत आहेत.

                                      
To Top