बारामती ! सोनगाव येथील जवान अशोक इंगवले यांना पंजाब येथे वीरमरण

Pune Reporter
बारामती दि १५ 

बारामती तालुक्यातील सोनगाव गावाचे सुपुत्र अशोक बापूराव इंगवले (वय - ३१ वर्षे) यांना देश सेवा बजावत असताना मंगळवार (दि-१५ फेब्रु) रोजी पंजाब येथे वीरमरण आले.

त्यांच्या पश्चात आई , वडील,पत्नी, दिड वर्षांचा मुलगा व दोन महिन्यांची मुलगी आणि छोटा भाऊ असा परिवार आहे.इंगवले यांना वीरमरण आल्याने त्यांचे कुटुंब ,मित्रपरिवार व संपूर्ण तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
To Top