सोमेश्वर रिपोर्टर टीम------
मोरगाव : प्रतिनिधी
तरडोली ता . बारामती येथील शिवाजी गुलाब कदम यांच्या पत्नीचे दि .१९ रोजी निधन झाले . व्यवसाया निमित्ताने ते लोणी काळभोर येथे राहत होते . पत्नीच्या निधनानंतर अंत्यविधीसाठी ते गावी आले असता चोरट्यांनी डाव ठेऊन तब्बल पंधरा तोळे सोने लंपास केले असुन कदम कुटुंबीयांवरील एक दुख : बाजुला होईपर्यंत दुसरे दत्त म्हणून आले आहे .
याबाबत सविस्तर वृत्त असे की , तरडोली येथील शिवाजी कदम हे व्यवसायानिमीत्ताने लोणी काळभोर नजीक कदमवाक् वस्ती येथील स्वामी कुंज सोसायटीमध्ये राहत आहेत . त्यांच्या पत्नीचे अल्पशा आजाराने निधन झाल्याने पुढील विधीसाठी सर्व कुटुंब तरडोली येथे आले होते . दरम्यान दि २४ रोजी सोसायटीमध्ये राहणारे विशाल पवार यांनी कदम यांना मोबाईल करुन तुमच्या फ्लॅटवर कोणी आले आहे का दरवाजा उघडा दिसत आहे अशी माहीती दिली .
कदम यांच्या कदमवाकवस्ती येथील घराचा दरवाजा अज्ञात चोरट्यांनी तोडून कर्णफुले , गंठण , बांगड्या , अंगठी , लक्ष्मीचे चित्र असलेले सोन्याचे शिक्के असे एकूण बारा तोळे सोन्याची चोरी झाली . यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले आहे . कदम कुटुंबीयांवर एक दुख: बाजुला होईपर्यंत दुसरे आले असल्याने परीसरातुन हळहळ व्यक्त होत आहे .