सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
जेजुरी : प्रतिनिधी
पुणे जिल्हा वृद्ध साहित्यिक मानधन समितीच्या वतीने दरवर्षी शंभर कलावंतांना उपजीविकेसाठी मानधन दिले जाते . पुणे जिल्ह्याचा विस्तार मोठा असून जिल्ह्यात कलावंतांची संख्या ही मोठी आहे . शंभर ऐवजी दरवर्षी तीनशे वृद्ध कलावंतांना मानधन देण्यात यावी अशी मागणी निवेदना द्वारे मानधन समितीचे सदस्य संजय सावंत यांनी पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांच्या कडे केली आहे .
पुणे जिल्ह्यात 13 तालुके दोन महानगरपालिका आहेत ,जिल्ह्याला सांस्कृतिक व धार्मिक वारसा लाभल्याने कलावंत व साहित्यिकांची संख्या जिल्ह्यात मोठी आहे .दरवर्षी मानधन मिळविण्यासाठी एक हजाराहून अधिक कलावंत अर्ज करत असतात .शासन निर्णयानुसार यातील केवळ शंभर कलावंतांची निवड करावी लागते,अनेक कलावंतांना उपेक्षित राहावे लागते . अधिकाधिक काळवंतांना मानधन मिळवून देण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करावा यासाठी आमदार संजय जगताप यांना निवेदन देण्यात आल्याचे संजय सावंत यांनी सांगितले .
COMMENTS