सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
भोर तालुक्याच्या दक्षिणेकडील विसगाव खोऱ्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बाजारवाडी येथे विध्यान दिनानिमित्त डॉ.सी.व्ही.रामन यांच्या प्रतिमेचे डॉ.सुरज महाडिक , केंद्रप्रमुख सुरेश कदम यांच्या हस्ते पूजन करून विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बाजारवाडी व धावडी येथील एकूण ८० विद्यार्थ्यांनी प्रदर्शनात प्रयोग मांडले होते. उपस्थित मान्यवरांनी सर्व उपक्रमांची पाहणी करून कौतुक केले.डॉ. सुरज महाडिक प्राध्यापक बी.एस.कदम यांनी विज्ञान दिन उपक्रमातून वैज्ञानिक दृष्टीकोन रुजवा असे सांगितले.यावेळी मुख्याध्यापक डी.के.पवार व्यवस्थापन समिती अध्यक्ष श् स्वप्नील वाघ यांनी मार्गदर्शन केले तर सायली शिंदे, स्वराज शिंदे यांनी भाषण केले तसेच स्वराज शिंदे याने एकपात्री नाट्य सादर केले.याप्रसंगी पुष्पा वीर,मुख्याध्यापक नंदकुमार डोंबे, आशा जाधव,किरण काळेल, सुदेश पाटील,भारती पिंगट सुरेश खोपडे उपस्थित होते.
COMMENTS