भोर ! नीरा-देवघर,टेमघर धरणग्रस्तांचे प्रश्न लवकरच मार्गी लागणार : आमदार संग्राम थोपटे

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : प्रतिनिधी
भोर-वेल्हा-मुळशी तालुक्यातील महत्वाच्या नीरा-देवघर व टेमघर धरण प्रकल्प ग्रस्तांचे काही वर्षांपासून प्रश्न प्रलंबित आहेत.या धरणग्रस्तांचे प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांचेसमवेत आमदार संग्राम थोपटे यांनी विशेष बैठक घेऊन धरण प्रकल्प ग्रस्तांच्या विविध प्रश्नांविषयी चर्चा केली.यावेळी सकारात्मक चर्चा झाल्याने लवकरच धरण ग्रस्तांचे प्रश्न मार्गी लागणार असल्याचे आमदार थोपटे यांनी सांगितले.
             या बैठकीत आमदार थोपटे यांनी हिर्डोशी गावचे धरणग्रस्त मा.सरपंच ज्ञानोबा धामुनशे यांचेवर राज्य शासनाकडून झालेल्या अन्यायाबाबत लेखी निवेदन देवून खेद व्यक्त केला.यावर मंत्री वडेट्टीवार यांनी पुढील आठ दिवसात याबाबत अहवाल मागवून न्याय देण्याचे आश्वासन दिले.यावेळी आमदार संजय जगताप, मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव गुप्ता, नीरा देवघर प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता- दिगंबर डुबल, जिल्हाधिकारी राजेश देशमुख,बाप्पू शिरवले, शहर युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष पप्पू कंक,बबन मालुसरे,धोंडीबा मालुसरे व अधिकारी उपस्थित होते.
To Top