सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
दौंड तालुक्यातील गुऱ्हाळ चालकांनी बारामती तालुक्यातील सुपे गावातील व परिसरातील शेतकऱ्यांना २० ते २५ लाखांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
दौंड तालुक्यातील गुऱ्हाळ चालकांनी बारामतीत तालुक्यातील सुपे तसेच सुपे परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सूमारे २० ते २५ लाखांचा गंडा घातला आहे पुणे जिल्ह्यातील दौंड तालुका हा गूळ उत्पादक करणारा तालूका म्हणून प्रसिद्ध आहे. याठिकाणी अनेक लहान मोठे गूळ तयार करणारे गुऱ्हाळ आहेत हे गुऱ्हाळ मालक तसेच त्यांना ऊस पूरवठा करणारे एजंट शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन ऊस खरेदी करतात काही काही शेतकरी हे पाण्याअभावी तर काही शेतकरी आपल्या प्रापंचिक अडचणींमुळे आपला ऊस हे गुऱ्हाळ चालकांचा देतात. याचाच फायदा काही ठराविक गुऱ्हाळ चालकांनी घेतला असून त्यांनी अनेक शेतकऱ्यांनी गंडा घातला आहे. शेतकऱ्यांचा ऊस नेऊन त्याना मात्र पैसे देण्यास टाळाटाळ करत आहेत उलट हे गुऱ्हाळ मालक शेतकऱ्यांना पैसे मागितले तर दमबाजी आणी मारण्याची धमकी देत आहेत असाच एक केडगाव येथील बाबू सय्यद नावाच्या ऐकाच व्यक्तीने सूपे परीसरात सूमारे १५ लांखाचा गंडा शेतकऱ्यांना घातला आहे त्यामध्ये एकट्या नारोळी गावात १० लाख रूपये बाबूर्डीमध्ये एक लाख रुपये खोपवाडी मध्ये तीन लाख रुपये असा शेतकऱ्यांना चूना लावला असून पैसे मागितले तर शिविगाळ मारण्याची भाषा करत असून तरी अशा लोकांवर जर कारवाई नाही झाली तर निश्चितच शेतकरी आत्महत्या करतील त्यांच्यावर रीतसर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी येथील शेतकरी करत आहे आणी शेतकऱ्यांनी पण आता येथून पूढे ऊस देताना चौकशी करून द्यावा अशी विनंती बाबूर्डी गावचे सरपंच ज्ञानेश्वर पोमणे, राजकुमार लव्हे तसेच सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक गणेश चांदगुडे यांनी केली आहे