बारामती पश्चिम ! सोमेश्वर विद्यालयात मराठी भाषा दिन विविध उपक्रमांनी साजरा

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
२७ फेब्रुवारी जेष्ठ कवी  वि. वा.शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून सोमेश्वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय (विज्ञान ), सोमेश्वरनगर  येथे ऑनलाईन प्रश्नमंजुषा, निबंध, हस्ताक्षर, स्वरचित काव्यलेखन अशा स्पर्धांचे आयोजन केले होते. याशिवाय मराठी विश्वकोश वाचन, स्पर्धेतील विजेत्या मुलांना बक्षीस वितरण  व मराठी भाषा शिक्षकांचा सन्मान अशा विविध उपक्रमांद्वारे साजरा करण्यात आला. 
   कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन प्रशालेचे प्राचार्य एस पी जगताप यांनी केले. त्यांनी, मराठी भाषेचे असणारे महत्व, विस्तार व भाषेची समृद्धता याविषयी त्यांनी आपले विचार व्यक्त केले. ग्रंथपाल सुजाता जगताप  यांनी मराठी भाषेची महती व्यक्त करणारी विविध गीते व अभंग सादर केले.
सृष्टी रासकर, विजेता सोनवणे, समीरा शेंडकर या विद्यार्थिनीनी स्वरचित कविता सादर केल्या. कार्यक्रम प्रसंगी जेष्ठ शिक्षक बी. बी. रणवरे , ए. एस. भोसले, एस. एम. वाबळे, एम. बी. धुमाळ  उपस्थित होते.
  कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेंद्र झुरंगे यांनी केले. सूत्रसंचालन आर. एस. शेंडकर व एम. डी. खोमणे यांनी तर आभार वर्षा कदम यांनी मानले.

स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे
अ ) निबंध स्पर्धा (लहान गट 5 ते 7)
    प्रथम - विजेता दत्तात्रय सोनवने 
    द्वितीय -(विभागून) श्रेया विशाल गायकवाड व समीरा संतोष शेंडकर
 तृतीय - विभागून - श्वेता सचिन शितोळे व श्रुतिका संदिप निगडे
मोठा गट (8 ते 10)
 प्रथम - धनश्री शिवाजी धायगुडे
द्वितीय - आकांक्षा रणजित नेवसे
तृतीय - (विभागून) सृष्टी दयानंद रासकर व सानिका सचिन ढोणे
ब ) काव्य लेखन स्पर्धा
       लहान गट ( 5 ते 7)
  प्रथम - (विभागून)विजेता दत्तात्रय सोनवणे व समीरा संतोष शेंडकर
 द्वितीय - (विभागून) पूजा मदाराम देवासी व तनिष्का सचिन खैरे
 तृतीय - (विभागून)सुहाना गुलाब रिठे व आकांक्षा विनोद मोहळकर
मोठा गट ( 8 ते 10)
 प्रथम  (विभागून)- तेजस्विनी दत्तात्रय सोनवणे व सृष्टी दयानंद रासकर
 द्वितीय - (विभागून) श्रेया शेखर गायकवाड व अनुष्का संतोष ओव्हाळ
 तृतीय - (विभागून) आकांक्षा गणेश तरटे व सानिका सचिन ढोणे
 हस्ताक्षर स्पर्धा ( मोठा गट 8 ते 10)
 प्रथम - धनश्री शिवाजी धायगुडे
 द्वितीय - साक्षी किशोर महामुनी
 तृतीय - पायल गणेश थोरात    
सोमेश्वर कारखान्याचे चेअरमन पुरुषोत्तम जगताप, व्हाईस चेअरमन आनंदकुमार होळकर, संस्थेचे सचिव भारत खोमणे, प्राचार्य एस. पी. जगताप यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले
To Top