सोमेश्वर रिपोर्टर टीम------
परिंचे : वार्ताहार
श्री क्षेत्र वीर(ता.पुरंदर) येथे यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या श्रीनाथ केसरी ची मानाची ढाल व रक्कम रु. २५०००/- बक्षीस रक्कम पै. विजय मांडवे यांनी संग्राम साळुंखे यांच्यावर मात करीत जिंकली.
श्री क्षेत्र वीर येथील कुस्ती आखाड्यात सातारा कोल्हापूर पुणे सोलापूर जिल्ह्यातील शेकडो मल्लांनी हजेरी लावली होती. श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान ट्रस्ट आणि कुस्ती संयोजन समिती, वीर यांचेमार्फत कुस्ती आखाड्याचे नियोजन करण्यात आले. दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती पै. राम धायगुडे आणि संतोष गावडे यांच्यात झाली. पंच म्हणून वीर गावचे पै. संग्राम धुमाळ, पै. दिगंबर धुमाळ, पै. लक्ष्मन जाधव, पै. किरण कांबळे यांनी काम केले. समालोचक : पै. प्रशांत भागवत सर बारामती, पै. अनिकेत कदम, फलटण, हलगी:बापू आवळे. कोल्हापूर.
आखाडा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी अमोल धुमाळ, अमर धुमाळ, बापू धुमाळ, गणेश धुमाळ, देशराज धुमाळ, रणजीत धुमाळ, समस्त ग्रामस्थ वीर यांनी मोलाचे सहकार्य केले.
यावेळी ट्रस्टचे चेअरमन संतोष प्रल्हाद धुमाळ ,व्हा. चेअरमन रवींद्र धुमाळ, विश्वस्थ हनुमंत धुमाळ, अभिजित धुमाळ, अमोल धुमाळ, नामदेव जाधव, शिवाजी कदम, संजय कापरे, राजेंद्र कुरपड, सल्लागार रामचंद्र धुमाळ, माधव धुमाळ, तानाजी धुमाळ, शंकर धुमाळ, विशाल धुमाळ इ. ट्रस्ट तर्फे व्यवस्था पाहिली.
COMMENTS