सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सासवड : प्रतिनिधी
पत्रकार हा समाजव्यवस्थेचा चौथा स्तंभ म्हणून ओळखला जातो. अनेक वेगवेगळ्या साथीच्या आजारात उदारणार्थ कोरोना रोगाच्या कालखंडामध्ये पत्रकारांनी आपल्या जीवाची बाजी लावून रस्त्यावरती उतरून काम केले होते. त्याच अनुषंगाने पुरंदर तालुका पत्रकार संघातील पत्रकारांची आरोग्य विमा पॉलिसी उतरण्याचा निर्णय सुदामआप्पा इंगळे मित्रपरिवाराने सुदामआप्पा इंगळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून घेतला असल्याची माहिती पुरंदर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष योगेश कामथे यांनी दिली.
मंगळवार (दि.१) रोजी महात्मा फुले विद्यालय, शिवरी येथील शरदचंद्रजी पवार साहेब सभागृहात महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील तसेच बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रियाताई सुळे, पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप, मावळचे आमदार सुनिल शेळके, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न होईल.
सुदाम इंगळे मित्रपरिवार यांच्यामार्फत तालुक्यातील पत्रकारांचा आरोग्य विमा उतरवण्यात येणार आहे. अशी माहीती पुरंदर तालुका मराठी पत्रकार संघाच्या बैठकीमध्ये देण्यात आली.
या कार्यक्रमासाठी जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे, सेवानिवृत्त सनदी अधिकारी संभाजी झेंडे, अशोक टेकवडे, विजय कोलते, दत्तात्रेय झुरुंगे,गणेश ढोरे, माणिकराव झेंडे, प्रदीप पोमण, दिलिप यादव, बाळासाहेब कामथे, पुरंदर तालुक्यातील सन्माननीय पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती पुरंदर तालुका मराठी पत्रकार संघाचे सचिव अमोल बनकर यांनी दिली.
यावेळी पुरंदर तालुका मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष प्रवीण नवले, कार्यकारणी सदस्य निखिल जगताप, संतोष डुबल, विशाल फडतरे, निलेश जगताप, संतोष जगताप, सुनिता कसबे, हनुमंत वाबळे, अमृत भांडवलकर आदी उपस्थित होते.