सोमेश्वर रिपोर्टर टीम------
वाई : प्रतिनिधी
वाई शहरातील रविवार पेठ परिसरात विना पालक रडत फिरत असणार्या एका ३ वर्षीय बालकाचा वाई पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांच्या मार्गदर्शना खाली डिबी पथकाने शोध घेऊन प्रेम शाहरूख बागवान असे बालकाचे नाव असुन त्याला त्याची आजी कमल नंदकिशोर सोनावणे यांच्या ताब्यात देण्यात आले पण आपल्या मुलांची देखभाल पालक करु शकत नाहीत हि दुर्देवी बाब आहे अशी खंत बाळासाहेब भरणे यांनी व्यक्त केली .
सविस्तर माहिती अशी की, वाई शहरातील रविवार पेठ परिसरात वाई पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक बाळासाहेब भरणे यांच्या सुचने वरुन डीबी विभागाचे पोलिस पथक गस्त घालत असताना या पथकाला विना पालक एक ३ वर्षीय बालक रस्त्यावर रडत फिरत असताना सापडले.या पथकाने ते बालक ताब्यात घेऊन त्याला घरी नेहुन जेवण दिले त्याच्या कडे नावाची चौकशी केली परंतु त्याला नाव सांगता येत नसल्याने त्याचे पालक शोधण्याचे मोठे आव्हान ऊभे राहिले होते .विनापलक असणार्या या मुलाला डिबी विभागाचे किरण निंबाळकर श्रावण राठोड अमीत गोळे चालक सागर धुमाळ यांनी रविवार पेठ परिसरासह वाई शहरातील मुख्य रस्त्यावरून पोलिस गाडीतून अलाऊंस करत तब्बल चार तास फिरले तरीही कोणीही पालक पुढे आले नसल्याने हे पथक बालकासह पोलिस ठाण्यात परतले .पण वाईच्या डिबी पथकाचा शोध मोहीमेत हातखंडा काम असल्याने अखेर सायंकाळी ४ वाजता या बेवारस बाळाच्या आजी पर्यंत हे पथक पोहचले आणी पोलिसही जबाबदारी मुक्त झाल्या सारखे या पथकाला वाटु लागले एका विना पालक फिरत असणार्या ३ वर्षीय बालकाला अथक परिश्रम घेऊन पालक मिळवुन दिल्या बद्दल वाई शहरातील नागरिकांन कडुन वाई पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांच्या सह डिबी पथकावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे .