सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
जेजुरी : प्रतिनिधी
कै.दिनकरराव सावंत प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्षपदी आनंदी लाईफलाईन मल्टी. हॉस्पिटलचे संचालक डॉ.सुमित काकडे यांची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती कै.दिनकरराव सावंत प्रतिष्ठानचे अध्यक्ष व वृद्ध साहित्यिक कलावंत मानधन समितीचे सदस्य पत्रकार संजय सावंत यांनी सांगितले.
कै. दिनकर सावंत प्रतिष्ठानच्या वतीने विविध क्षेत्रात सामाजिक कार्य करणार्या व्यक्तींना राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार देवून गौरविण्यात येते.त्याचबरोबर गरजू विद्यार्थांना शाळेत साहित्य व गणवेश वाटप करण्यात येते.