सोमेश्वर रिपोर्टर टीम------
वाई : दौलतराव पिसाळ .
वाई तालुक्यातील राजकीय दृष्ट्या जागृत असलेल्या केंजळ गावातील छत्रपती शिवाजी महाराज प्रेमी ग्रामस्थांनसह तरुणांनी एकत्रीत येवुन दि.१२ च्या मध्य रात्रीच्या वेळी
तालुका प्रशासनाची कुठल्याही प्रकारची परवानगी न घेताच छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवल्याने गावासह वाई तालुक्यात खळबळ ऊडाली आहे ..
याची माहिती तालुक्यातील महसुल आणी पोलिस प्रशासनाला लागताच यातील
अधिकारी वर्ग खडबडून जागे झाले घडल्या प्रकाराची माहिती तालुका प्रशासनाने जिल्हाधिकारी जिल्हा पोलिस प्रमुख यांना देऊन वरिष्ठांच्या आदेशा नुसार केंजळ गावातील जबाबदार गाव कारभारी यांच्या सोबत चर्चा करण्या साठी सातारा पोलिस दलाच्या वतीने पोलिस ऊप अधिक्षक गणेश केंद्रे वाईचे तहसीलदार रणजित भोसले वाई पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब भरणे भुईंज पोलिस ठाण्याचे सपोनि आशिष कांबळे असे दाखल होऊन या सर्वांनी एक बैठक घेऊन त्या मध्ये प्रशासनाची रितसर अवश्यक असणार्या सर्व परवानग्या घेऊन पुतळा बसविण्यास हरकत नसल्याचे सांगुन तो पर्यंत पुतळा हटविण्यात यावा असा चर्चेचा प्रस्ताव
ग्रामस्थांन समोर ठेवला पण ऊपस्थितीत ग्रामस्थांनी आणी तरुणांनी तो प्रस्ताव धुडकावून लावत पुतळा काढण्या साठी विरोध केल्याने प्रशासना समोर मोठा पेच निर्माण झाले आहे .पुढे महसूल आणी पोलिस प्रशासन
काय भुमीका घेणार या कडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागुन राहिले आहे .