सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : प्रतिनिधी
भोर येथील उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णकल्यानं समितीच्या कार्यकारी सदस्यपदी हिरडोशी येथील सामाजिक कार्यकर्ते विलास मादगुडे तर भोर शहरातील नितीन सोनावले यांची नियुक्ती करण्यात आली.पंचायत समिती सभापती लहूनाना शेलार यांच्या शिफारशीनुसार ही निवड करण्यात आली.नियुक्तीचे पत्र उपजिल्हा रुग्णालयाचे वैदयकीय अधीक्षक डॉ.अमित सरदेसाई यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते.