नीरा खोरं ! रस्त्यात 'खड्डा' की 'खड्या'त रस्ता ...l मुरूम-होळ-वडगाव रस्त्यावर जीवघेणे खड्डे

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
होळ ते मुरुम(ता. बारामती) या रस्त्याची दुरावस्था झाल्याने रस्त्यात खड्डा की खड्यात रस्ता अशी म्हणण्याची वेळ वाहनचालकांवर आली आहे. रस्त्यावर जीवघेणे खड्डे पडले असून अपघात झाल्यानंतरच रस्त्याची दुरुस्ती होणार का असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे. सातारा आणि पुणे जिल्ह्यातील नागरीकांना महत्वाचा आणि मधला मार्ग असल्याने रस्त्यावर सातत्याने वाहतूक सुरु असते. होळ ते (मुरूम)साळोबावस्ती या दरम्यान रस्त्यावर मोठे खड्डे पडले असून साईटपट्या खचल्या आहेत याशिवाय शेतकऱ्यांनी शेतीसाठी नेहलेल्या पाईपलाईनचे खड्डे धोकादायक बनले असून अपघाताचा धोका वाढला आहे.
होळ व परीसरातील अनेक राजकीय पदाधिकारी या रस्त्याने ये- जा करत असताना त्यांना या रस्त्याची दुरावस्था दिसत नाही का असा नाही का असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
          होळ ते वडगाव निंबाळकर याही रस्त्याची दुरुस्तीची गरज वाहन चालकांकडून व्यक्त होत आहे. सध्या सोमेश्वर कारखान्याचा गाळप हंगाम सुरू आहे याशिवाय कारखान्याचा मळीचा प्रकल्प याच मार्गावर असल्याने ऊसाच्या बैलगाड्या, उसाचे ट्रक, मळीचे टॅंकर येथून प्रवास करत असतात रस्ता खराब झाल्याने वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागते. दोन्हीही बाजूंकडून झाडेझुडपे वाढली असल्याने दोन वाहने एकाचवेळी आल्यास प्रवासात अडथळा निर्माण होतो. गेल्या कित्येक वर्षात या रस्त्याची दुरुस्ती झाली नसल्याने ही करावी अशी मागणी स्थानिक नागरीकांसह वाहन चालक करत आहेत. सोमेश्वरनगर, मुरूम, होळ, वडगाव निंबाळकर, कोऱ्हाळे खुर्द तसेच फलटण तालुक्यातील नागरीकांसाठी दळणवळणासाठी हा महत्वाचा आणि मधला मार्ग आहे. याशिवाय शेतात जाण्यासाठीही याच रस्त्याचा उपयोग शेतकरी करत आहेत त्यामुळे अपघात होण्यापूर्वीच रस्त्याची दुरुस्ती व्हावी अशी मागणी परीसरातून होत आहे.

To Top