वाई ! पसरणी घाटात 'द बर्निंग बस'चा थरार : ३५ भाविकांचे प्राण वाचले

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
वाई : प्रतिनिधी
माहाड शेजारील माणगाव गोरेगाव येथील ३५ भाविकांनी एकत्रीत येऊन महाड येथील खाजगी बस क्र.एम.एच.०६.एस .९३५४ या   मधुन  पंढरपूर येथील विठूरायाचे दर्शनासाठी शुक्रवारी गेले होते तेथुन ते देवदर्शनाचा कार्यक्रम ऊरकुन आज दि.२० रोजी वाई तालुक्यातील मांढरदेव येथील काळुबाईचे दर्शन साठी दुपारी पोचले तेथील देवदर्शनाचा  कार्यक्रम ऊरकुन पुन्हा हे भाविक दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास मांढरदेव हून वाई 
पसरणी घाटातुन  महाडकडे जात असताना  त्यांची बस घाटात असणार्या दत्त मंदीरा जवळ आली असता अचानक बसच्या इंजीन मधुन धुराचे लोट येवु लागल्याने चालक रविंद्र पोळसकर यांनी प्रसंगावधान राखून बस रस्त्याच्या कडेला ऊभी करुन बस मधील  बायका मुलांनसह बसलेल्या पुरुष वर्गाला तातडीने खाली उतरण्यास सांगताच एकच आरडा ओरडा सुरु झाला आणी भाविकांन समक्षच क्षणार्धात बसणे पेट घेतला याची माहिती येणार्या जाणार्यांनी वाई पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांना दिली  भरणे हे साप्ताहिक सुट्टीवर असताना देखील घटनेचे गांभीर्य ओळखून भयभीत झालेल्या भाविकांच्या मदतीसाठी वाई
 पोलिस ठाण्याचे पिएसआय पवार हवलदार वरखडे श्रावण राठोड रुपेश जाधव निलेश देशमुख यांना तातडीने घटना स्थळावर जाण्याचे आदेश दिले त्याच बरोबर  
 पाचगणी पोलिस ठाण्यातील पिएसआय वाय.एस.महामुलकर हे तातडीने हवलदार एस.एस.बोराटे एम.सी.जायगुडे .यु.आर.लोखंडे या पोलिस सहकार्याना सोबत घेऊन तातडीने घटना स्थळावर दाखल होऊन वाई आणी पाचगणी पोलिसांनी प्रथम अग्नीशमक यंत्रणेच्या साह्याने 
आग विझवण्या साठी अथक परिश्रम घेतले पण दुर्दैवाने बस जळुन खाक झाली .त्यात ३५ 
भाविकांचे सर्व कपडे आणी काही महिलांचे सोन्याचे दागिने जळुन खाक झाले.
घाटात रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब  रांगा लागलेल्या होत्या हि तुमलेली वाहतुक या पोलिसांनी सुरळीतपणे चालु केली .
To Top