सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सासवड : प्रतिनिधी
तेरावे राज्यस्तरीय छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलन सासवड येथे (ता. पुरंदर) येथे दि.१२ मार्च २०२० रोजी होणार आहे, उद्घाटन समारंभ, कथाकथन, ग्रंथदिंडी, नाट्यप्रयोग, कविसंमेलन, पुरस्कार वितरण असे भरगच्च कार्यक्रम होणार आहेत. अशी माहिती संमेलनाचे मुख्य संयोजक व ज्येष्ठ साहित्यिक दशरथ यादव यांनी पत्रकार परिषदेत दिली.
संमेलनाच्या संयोजन बैठकीला डॉ भालचंद्र सुपेकर, राजाभाऊ जगताप, प्रसिद्धी प्रमुख दत्तानाना भोंगळे, सुनील लोणकर, श्यामकुमार मेमाणे, गंगाराम जाधव, नंदकुमार दिवसे, बहुजन हक्क परिषदेचे सुनील धिवार, दत्ता कड, रवींद्र फुले, दत्ता होले आदी उपस्थित होते.
दरवर्षी जगतगुरु तुकोबाराय साहित्य परिषदेच्या वतीने साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येते. संमेलनात राज्यभऱातून लेखक, कवी सहभागी होतात. क-हा नदीच्या काठावर रंगणा-या या साहित्य संमेलनात पुस्तकांचे प्रकाशन करण्यात येणार आहे. संमेलनात सहभागी होऊ इच्छिणा-या लेखक,कवींनी मो.९८८१०९८४८१ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन राजाभाऊ जगताप यांनी केले आहे.