सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
होळ ता. बारामती येथिल ढगाईदेवी मंदिरातील दानपेटी चोरीला गेल्याचा प्रकार रविवारी रात्री घडला.
रविवारी सायंकाळी सहा वाजता मंदीर बंद केले होते सोमवारी सकाळी मंदीरात पुजारी पुजेसाठी गेले असता चोरीचा प्रकार उघडकीस आला. गाभाऱ्याचा दरवाजाचे कुलुप तोडुन चोरट्यांनी आत प्रवेश केला दानपेटी ची साखळी तोडुन दानपेटी चोरून नेली. तात्काळ ग्रामस्थांना याबाबत माहिती देण्यात आली. घटनास्थळी वडगाव निंबाळकर पोलीस कर्मचारी गेले असता मंदिरातील सीसीटीव्ही यंत्रणा पहिली यामध्ये दोन चोरटे दानपेटी घेऊन जात असताना दिसुन आले आहेत. निरा नदीकाठावर असलेले ढगाईदेवी पंचक्रोशीतील भाविकांचे श्रद्धास्थान मानले जाते. चोरीचे प्रकार घडल्यामुळे भाविकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्यांचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.