राज्याचे महिला बालकल्याण व शिक्षण राज्यमंत्रीबच्चू कडू यांना न्यायालयाने दोन महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
चांदूरबाजार प्रथम वर्ग न्यायालयाने हा निर्णय जाहीर केला आहे. बच्चूकडू यांनी 2014 च्या विधानसभा निवडणुकीत मुंबई येथील फ्लॅटबद्दलची माहिती लपवणं बच्चू कडूंना महागात पडल्याची चर्चा आहे. भाजपचे नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी 2017 मध्या बच्चू कडू यांच्याविरोधात
याप्रकरणी तक्रार केली होती.
बच्चू कडू यांनी मुंबईत 42 लाख 46 हजार रुपयांचा मालकीचा फ्लॅट असतानाही 2014 ची विधानसभा निवडणुकीवेळी या फ्लॅटबद्दलची माहिती निवडणूक आयोगाला दिली नाही, असा आरोप बच्चू कडूंवर होता. याच आरोपांवरुन 2017 मध्ये कडूंविरुद्ध लोकप्रतिनिधी कायद्यान्वे गुन्हा दाखल झाला होता.