सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
बालाजीनगर : प्रतिनिधी
पुणे : धनकवडी परिसरातील सुदामाता मंदिर परिसरात सर्वे नंबर ६३ बाबाजीनगर भागात सायंकाळी तब्बल पंचवीस पेक्षा जास्त सिलेंडरचे स्फोटमुळे मोठ्या प्रमाणात आग लागल्याची घटना घटली.
कात्रज अग्निशामक केंद्राबरोबरच कोंढवा आणि भवानी पेठ अग्निशामक केंद्रातील गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. स्फोट झालेले ठिकाणी उंचीवर असल्याने आणि गाड्या जाण्यास पुरेसा रस्ता नसल्याने जवळपास दोनशे फुट लांब पाईपच्या साह्याने पाण्याचा मारा करून आगी वर नियंत्रण मिळविण्यात अग्निशामक केंद्रातील जवानांना यश मिळाले.