.....अखेर २७ हजार सभासदांची प्रतीक्षा संपली : २५०० प्रतिदिन क्षमतेने 'सोमेश्वर'ची गाळप क्षमता वाढणार

Admin
3 minute read
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या महत्वकांक्षी विस्तारवाढ प्रकल्पाची प्रतीक्षा आता संपली असून गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर दि. २ एप्रिल रोजी हा प्रकल्प कार्यान्वित होत आहे. 
             राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभहस्ते या 
 कारखाना विस्तारवाढ प्रकल्प प्रत्यक्षात कार्यान्वित करण्यात येणार आहे. गेल्या चार वर्षात पावसाच्या  वाढलेल्या प्रमाणामुळे दरवर्षी सोमेश्वरच्या कार्यक्षेत्रात उसाचे क्षेत्र वाढत गेले. सन २०१९-२० च्या ऊस लागवड हंगामात कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील सभासदांची तब्बल ३८ हजार एकरांवर ऊसाची नोंद झाली तर पाच हजार एकरांवर बिगर सभासदांच्या ऊसाची नोंद झाली. त्यामुळे सन २१-२२ चा हंगाम सुरू करताना ऊस ऊस गाळपाचा प्रश्न संचालक मंडळाला चिंतीत करणारा  होता. मात्र सभासदांचा ऊस घालवणे तर महत्वाचे होते. शेजारील दुसऱ्या कारखान्यांना ऊस द्यावा तर त्यांच्याच कार्यक्षेत्रात उसाचे अतिरिक्त क्षेत्र..मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नवख्या चेहऱ्यांना संधी जरी दिली असली सभासदांचा ऊस संपण्यासाठी संचालक मंडळ इतर कारखान्यांचे उंबरे झिझवत होते. त्यांच्या प्रयत्नांना थोडे का होईना यश आले होते. सभासदांचा १ लाख ३७ हजार टन तर बिगर सभासदांचा ९७ हजार टन असा  २ लाख ३४ हजार टन बाहेरील कारखान्याला गेल्याने सोमेश्वर च ओझं काहीसं कमी झालं होतं.  
           सद्या कार्यान्वित होणारे कारखाना विस्तारवाढ प्रकल्प हा एकूण ७५ कोटी ६५ लाख रुपये किंमतीचा असून पूर्वीच्या ५ हजार प्रतिदिन गाळप क्षमतेत २ हजार ५०० प्रतिदिन क्षमतेने वाढ करण्यात आली आहे. रोज ८ हजार ५०० प्रतिदिन गाळप केले तर उर्वरित राहिलेले ४ लाख १५ हजार टन ऊस पुढील ४५ दिवसात संपण्याचा संचालक मंडळाचा मानस आहे. 
         यावेळी बोलताना कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप म्हणाले की, चालु गळीत हंगामाकरीता १५७ दिवसांमध्ये प्रतिदीन ६३०० मे. टनाचे सरासरी गाळप करुन कारखान्याने आजअखेर ९ लाख ९१ हजार ८२४ मे.टन ऊसाचे गाळप पुर्ण केले असुन यातुन सरासरी ११.६४ टक्केचा साखर उतारा राखत ११ लाख ४९ हजार ५० साखर पोत्यांचे उत्पादन घेतले आहे. सोबत कारखान्याच्या कोजन प्रकल्पामधुन आजअखेर ७ कोटी ४१ लाख ७२ हजार ६६९ युनिट्स वीजनिर्मिती केली असुन ४ कोटी ५४ लाख ७१ हजार ३६ युनिट्सची वीजविक्री केलेली आहे. त्याचप्रमाणे कारखान्याच्या डिस्टीलरी प्रकल्पातुन आजअखेर ७५ लाख २७ हजार ४६ लिटर्स अल्कोहोलचे उत्पादन घेतले असुन ३२ लाख ३९ हजार ८२६ लिटर्स इथेनॉलचे उत्पादन घेतले आहे.तसेच कारखान्याचा विस्तारीकरण प्रकल्प प्रत्यक्षात सुरु करणेसाठी आवश्यक असणारे सर्व चाचण्या पुर्ण झाल्या असुन यामध्ये हायड्रोलिक ट्राईल, व्हॉक्युम ट्राईल, स्टीम ट्राईल या चाचण्या यशस्वीपणे पार पडल्या आहेत. आपला विस्तारीकरण प्रकल्प पुर्ण झालेनंतर आपण प्रतिदीन ८५०० मे.टनाने गाळप करणार असुन यामुळे सध्या कारखाना कार्यक्षेत्रात उभा असलेला संपुर्ण नोंदलेल्या ऊसासह बिगर नोंदिचा ऊससुद्धा आपण येत्या ४५ दिवसात गाळप करणार आहोत.
To Top