सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सुपे : प्रतिनिधी
बाबुर्डी गावातील तरूण निलेश बाळासाहेब पोमणे यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झाल्याबद्दल निलेशची गावातून घोड्यावर मिरवणूक काढून गावच्या वतीने बारामतीचे उपविभागीय अधिकारी गणेश इंगळे यांच्या हस्ते नागरी सत्कार करण्यात आला.
यावेळी उपविभागीय अधिकारी गणेश इंगळे यांनी स्पर्धा परीक्षा विषय यूवकांना मार्गदर्शन केले यावेळी चांडाळ चौकडीच्या करामती या वेबसिरीलमधील बाळासाहेब शिंदे तसेच रामभाऊ जगताप यांनीही आपले मनोगत व्यक्त केले यावेळी सत्काराला उत्तर देताना निलेश यांनी आपल्या आतापर्यंतच्या वाटचालीचा आढावा मांडला निलेश हा बाबूर्डी गावचे माजी सरपंच तसेच बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक बाळासाहेब पोमणे यांचा मुलगा तसेच बाबूर्डी ग्रामपंचायतचे विद्यमान युवा सरपंच ज्ञानेश्वर पोमणे यांचा बंधू आहे कार्यक्रमासाठी चांडाळ चौकडीच्या करामती मधील सुभाष मदने, संजय खलाटे, सरपंचाची भूमिका साकारनारे पत्रकार सूदाम नेवसे उपस्थित होते तसेच पत्रकार सचिन पवार, बारामती तालूका राष्ट्रवादी काँग्रेसचे यूवक अद्यक्ष राहूल वाबळे, संजय दरेकर, निरा मार्केट कमिटिचे मुरलीधर ठोंबरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालूका सरचिटणीस सूखदेव हिवरकर, डॉ ऊपादे, सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक हरीभाऊ भोंडवे, बारामती तालूका तनिष्का अध्यक्ष तसेच समता नागरी पतसंस्था संचालिका ज्योती लडकत, पोलिस पाटील वनिता लव्हे, पळसीचे माजी सरपंच माणिक काळे, बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती शौकत कोतवाल, सूपे गावचे माजी सरपंच महादेव जगताप, गीरमे इत्यादी मान्यवर तसेच गावातील सर्व आजी माजी पदाधिकारी, तरूण वर्ग, महिला व सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
COMMENTS