बारामती ! २१ धावा आणि ३ गडी राखून पत्रकार संघाचा कारखाना संचालकांवर विजय

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------ 
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
गेले  दहा दिवस करंजेपुल येथे सुरु असलेल्या  सोमेश्वर कारखाना संचालक ऋषीकेश गायकवाड व मित्रपरिवार आयोजीत  डायरेक्टर चषक मधे शनिवारी  बारामती तालुका ग्रामीण पत्रकार संघ व सोमेश्वर सहकारी कारखाना संचालक यांच्यात झालेल्या लढतीत २१ धावा व तीन गडी राखुन पत्रकार संघाने संचालक मंडळावर दणदणीत विजय मिळवला . 
      नाणेफेक जिंकल्यावर सोमेश्वर कारखाना अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप  यानी फिल्डींग घेतली. पत्रकार संघाने सहा ओव्हर मधे ४७ धावा काढल्या . मात्र त्या धावांचा पाठलाग करताना संचालक मंडळाला दमछाक झाली. २६ धावात सर्व बाद झाले कारखाना अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांच्या  बॉलींग ने पत्रकार संघाचे अनेक सदस्य बाद केले मात्र संचालक सुनील भगत यांच्या बॉलींग वर गणेश आळंदीकर यानी सलग पाच चौकार ठोकल्याने व त्याना पत्रकार सचीन वाघ यानी दिलेल्या साथीने  मोठी धावसंख्या उभारण्यात यश आले . पत्रकार संघातर्फे कप्तान संतोष शेंडकर यांचेसह दत्ता माळशिकारे महेश जगताप ,युवराज खोमणे ,अमर वाघ ,गणेश आळंदीकर ,सचीन वाघ ,सुनील जाधव ,संतोष भोसले ,हेमंत गडकरी ,चिंतामणी क्षीरसागर हे सदस्य खेळले तर सोमेश्वर कारखाना संचालकातर्फे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप ,उपाध्यक्ष आनंदकुमार होळकर ,संचालक संभाजी होळकर, राजवर्धन शिंदे ,शैलेश रासकर ,ऋषीकेश गायकवाड ,रणजीत मोरे ,प्रवीण कांबळे,तुषार माहुरकर ,जितेंद्र निगडे ,सुनील भगत ,किसन तांबे ,संग्राम सोरटे ,हरिभाऊ भोंडवे हे संचालक खेळले आयोजक ऋषी गायकवाड यानी सामन्याच्या आयोजनामागील उद्देश सांगताना आपसातले मैत्री सबंध दृढ व्हावेत असा आहे असे सांगीतले तर कारखाना अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यानी सध्या ऊस गाळपाचा मोठा ताण संचालक मंडळावर असताना या ताणातुन काही काळ मुक्तता करण्यासाठी डायरेक्ट चषक चे आयोजन कर्ते व पत्रकारांच्या खेळीचे कौतुक केले.
------------------- ---------------
पत्रकार संघामधे धावांचा डोंगर निर्माण करताना सलग पाच चौकार मारुन २० रन करणारे पत्रकार गणेश आळंदीकर याना मॅन ऑफ दी मॅच चा बहुमान देण्यात आला. उत्कृष्ठ बॉलर म्हणून अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, उत्कृष्ट झेल सुनील भगत तर उत्कृष्ठ यस्टीरक्षक म्हणून शैलेश रासकर व संतोष शेंडकर यांनी बहुमान मिळवला.
To Top